बिलोली – रत्नाकर जाधव
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देगलूर मतदारसंघात इच्छुक लोकप्रतिनिधी संपर्क दौरे चालू झाले आहेत.त्याच बरोबर आत्ता शासकीय सेवेतून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनाही राजकारणाचे वेड लागल्याने तेही आत्ता आमदारकीसाठी इच्छुक झाले आहेत. त्यामुळे आत्ता उमेदवारासाठी लोकप्रतिनिधी व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.विशेष म्हणजे देगलूर बिलोली मतदारसंघात इच्छुकांपैकी लोकप्रतिनिधी व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांमधील इच्छुका मध्ये मुखेडकरांचा भरणा आहे.
विधानसभा निवडणुकीचे सध्या वारे वाहू लागले असून आमदारकीसाठी इच्छुक लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात संपर्क दौरे सुरू केले आहेत.मतदारसंघात दोन्ही राष्ट्रीय पक्षाकडून ग्राऊंड लेवलवर काम करणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधीनाच उमेदवारी देण्यासाठी नेत्यांवर दबाव आणला जात आहे.
लोकसभेच्या निकाला नंतर मतदारसंघात काँग्रेस व भाजपाकडून लोकप्रतिनिधीसह आत्ता शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनाही आमदारकीचे वेध लागले आहे.स्थानिक लोकप्रतिनिधी मध्ये काँग्रेस व भाजपात इच्छुकांमध्ये नवीन चेहरे समोर येत आहेत. तर प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले.
अधिकाऱ्यांमध्ये मंत्रालयात उपसचिव म्हणून राहिलेले मधु गिरगावकर,माजी अप्पर जिल्हाध्यक्ष बि.एम.कांबळे, वनविभागात उपायुक्त म्हणून राहिलेले व्हि.जे.वरवंटकर,सेवानिवृत्त मुख्याध्यापक गंगाधर सोनकांबळे,देगलूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य उत्तमकुमार कांबळे यांचा समावेश आहे.सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या यादीत ही स्थानिक पेक्षा मतदारसंघाच्या बाहेरच्या इच्छुकांचाच समावेश आहे.केवळ मधू गिरगावकर जर सोडले तर बाकी सर्वांची जन्मभूमी मतदारसंघा बाहेरील आहे.स्थानिक राजकीय पुढाऱ्यांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी जशी स्थानिक विरुद्ध बाहेरील असा संघर्ष…