राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्यानंतर देशात #भागवत_माफी_मांगो हे twitter वर ट्रेड सुरु झाले, यावर RSS संघटनेने स्पष्टीकरण दिले आहे. भागवत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात सत्य हाच ईश्वर असल्याचे सांगितले होते. सत्यच सर्वशक्तिमान आहे, रूप काहीही असो, क्षमता एकच आहे, उच्च किंवा नीच नाही, काही पंडित शास्त्राच्या आधारे जे सांगतात ते खोटे आहे. जातीच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनेत अडकून आपली दिशाभूल झाली, हा भ्रम दूर करावा लागेल. यातील ‘पंडित’ शब्दावरून देशात वाद सुरु झाला होता.
निवेदनातील ‘पंडित’ या शब्दाचा अनेकांनी निषेध केला. यावर संघाचे नेते सुनील आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की मोहन भागवत संत रविदास जयंती कार्यक्रमात होते. त्यांनी ‘पंडित’ म्हणजे ‘विद्वान’ असा उल्लेख केला. सत्य हे आहे की मी सर्व प्राणिमात्रांमध्ये आहे, त्यामुळे नाव काहीही असले तरी गुण एकच आहे. आदर एक आहे. प्रत्येकाबद्दल आत्मीयता असते. कोणीही उच्च किंवा नीच नाही. धर्मग्रंथांचा आधार घेऊन काही विद्वान जे जातीवर आधारित उच्च-नीचतेबद्दल बोलतात, ते खोटे आहे.
ते म्हणाले होते की संत रविदास म्हणाले तुमचे काम करा, तुमचे काम धर्माप्रमाणे करा. संपूर्ण समाजाला जोडा, समाजाच्या प्रगतीसाठी काम करणे हाच धर्म आहे. केवळ स्वतःचा विचार करून पोट भरणे हा धर्म नाही आणि त्यामुळेच समाजातील मोठे लोक संत रविदासांचे भक्त झाले.
लोकांनी कोणत्याही प्रकारचे काम केले तरी त्याचा आदर केला पाहिजे, असे भागवत म्हणाले होते. श्रमाचा आदर नसणे हे बेरोजगारीचे एक कारण आहे. कामासाठी शारीरिक श्रम किंवा बुद्धिमत्ता आवश्यक आहे का, त्यासाठी कठोर परिश्रम किंवा सॉफ्ट स्किल्स आवश्यक आहेत – सर्वांचा आदर केला पाहिजे.