Tuesday, November 5, 2024
Homeदेशनोटांवर लक्ष्मी-गणेशानंतर आता 'या' थोर पुरुषांचे फोटो लावा...

नोटांवर लक्ष्मी-गणेशानंतर आता ‘या’ थोर पुरुषांचे फोटो लावा…

दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनावर महात्मा गांधींसोबत भगवान लक्ष्मी-गणेश यांच्या फोटोची मागणी करून राजकीय वाऱ्याला शह दिला आहे. गुजरात निवडणुकीपूर्वी या मागणीवरून काँग्रेसपासून ते भाजपपर्यंत आक्रमक होत आहे. भाजप याला केजरीवाल यांचा हिंदुत्वावरचा यू-टर्न म्हणत असतानाच काँग्रेसच्या नेत्यांनीही तोंडसुख घेतलंय.

केजरीवाल यांच्या वतीने माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांच्यानंतर आता नोटांवर छत्रपती शिवाजी आणि बाबासाहेब आंबेडकर यांचीही नोंद करण्यात आली आहे. नोटांवर छत्रपती शिवरायांचे चित्र असायला हवे, असे भाजप नेते नीतेश राणे यांनी म्हटले आहे. अशा नोटाचे फोटोशॉप केलेले छायाचित्रही त्यांनी पोस्ट केले आहे. तर याच बरोबर भाजपचे नेते राम कदम यांनीही थेट उडी घेत छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह नरेंद्र मोदी व वि.दा. सावरकर यांचे फोटो एडीटेड करून ट्वीट केले आहे.

कुठून सुरु झाला वाद
या संपूर्ण वादाची सुरुवात आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेने झाली. भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबत भगवान लक्ष्मी-गणेश यांचे चित्र असावे, अशी मागणी केजरीवाल यांनी केली. त्यांच्या आशीर्वादाने भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि डॉलरच्या तुलनेत रुपया सुधारेल. यावेळी त्यांनी इंडोनेशियाचे उदाहरणही मांडले.

भाजप-काँग्रेसवर हल्लाबोल केला
केजरीवाल यांच्या या वक्तव्यानंतर देशात नोटांवरून राजकारण सुरू झाले. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, हिंदू देव-देवतांचा अपमान करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचा हा यू-टर्न आहे. यानंतर काँग्रेस नेते सलमान सोळ म्हणाले, नोटांवर भगवान गणेश आणि माता लक्ष्मीचा समावेश केल्यास समृद्धी येईल, तर अल्लाह, येशू आणि गुरु नानक यांचाही त्यात समावेश केला पाहिजे.

त्यात भाजप नेते नीतेश राणे च्यामागणीनंतर राम कदम यांनी काही मिनिटांमध्येच ट्वीटरवरुन चार फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ५०० रुपयांच्या चलनी नोटेवर छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो दिसत आहेत. यापैकी छत्रपती शिवाजी महारांजांचा फोटो हा तान्हाजी चित्रपटामध्ये अभिनेता शरद केळकरने साकारलेल्या पात्राचा असल्याचं दिसत आहे. हे फोटो शेअर करताना राम कदम यांनी, “अखंड भारत.. नया भारत.. महान भारत.. जय श्रीराम .. जय मातादी” अशी कॅप्शन दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: