न्युज डेस्क – भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्याबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतने फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये पंत फलंदाजी करताना दिसत आहे.
या व्हिडिओनुसार पंतने मंगळवारी (15 ऑगस्ट) बराच वेळ क्रीजवर फलंदाजी केली. तो फलंदाजीला उतरताच तेथे उपस्थित चाहत्यांनी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी घोषणाबाजी सुरु केली. अपघातानंतर पंतने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) बराच वेळ घालवला. यादरम्यान त्याने आधी स्वत:ला तंदुरुस्त केले आणि नंतर विकेटकीपिंग-बॅटिंगचा सराव केला. आता तो प्रथमच कोणत्याही प्रकारच्या सामन्यात उतरला. स्थानिक सामन्यात त्याने दीर्घकाळ फलंदाजी करत चौकार आणि षटकार मारले.
30 डिसेंबर 2022 रोजी दिल्ली-डेहराडून महामार्गावर पंत यांच्या कारला अपघात झाला होता. यामध्ये ते गंभीर जखमी झाला. त्याच्या शरीरावर जखमा होत्या. अलीकडेच फलंदाजी आणि विकेटकीपिंग पुन्हा सुरू केल्यानंतर पंतची पुनरागमनाची तारीख अजून लांब आहे. पुढील वर्षी इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेतून तो पुनरागमन करेल, असे मानले जात आहे.