Sunday, December 22, 2024
Homeराज्यअखेर त्या युवतीची हत्याचं!…पातूर तालुक्यात खळबळ…

अखेर त्या युवतीची हत्याचं!…पातूर तालुक्यात खळबळ…

पातूर तालुक्यातील ग्राम शिर्ला येथील 19 वर्षीय युवती ही शौचालय ला जाते असे सांगून गुरुवार पासुन घरी आली नसल्याने युवतीचे आईने पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दाखल केली होती, मात्र आज सकाळी या युवतीचा मृतदेहच मिळून आल्याने एकच खळबळ उडाली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की अकोला महामार्ग वरील शिरला खदान येथील युवती शौचालयासाठी जाते म्हणून गेली असता आज सकाळी सुमित्राबाई अंधारे कृषि महावि्यालयाच्या पाठीमागील इंगळे यांच्या शेताचे काठावर काटेरी झुडपे असलेल्या ठिकाणी मृतदेह आढलून आला.

सदर ची घटनेची माहिती मिळताच ठाणेदार किशोर शेळके आपल्या ताफ्यासह पोहचले असता मृतदेह हा ओढणी ने गळा आवळला असून दोन्हीही हात ओढणी ने बांधलेले आढलुन आल्याने हत्या झाली असल्याचे स्पष्ट झाले असता याठिकाणी श्वान रेवा हिने चप्पलचा वास घेऊन संशयिताच्या घरी पोहचले तेथून पोलिसांनी आरोपीचा पॅन्ट जप्त केली घटनास्थळ वर उपअधिक्षक. डोंगरे उपविभागीय अधिकारी गोकुळराज, स्था. गु . शा शंकर शेळके, आदीनी भेट दिली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: