अकोला- स्थानीय तापडिया नगर परिसरातील भारत विद्यालय सलग्नित ना.के. गोखले कनिष्ठ महाविद्यालयाचा यावर्षीही बारावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लागून असून महाविद्यालयायाने आपली परंपरा कायम ठेवली आहे. महाविद्यालयाची उत्तीर्ण टक्केवारी 99.27 टक्के लागली आहे. यात कु शर्वरी मोहरील या विद्यार्थिनी 93 टक्के गुण प्राप्त करून महाविद्यालयातून प्रथम स्थान प्राप्त केले आहे. द्वितीय स्थानावर साक्षी शिरसागर ही आली असून तिने 91.33 टक्के गुण प्राप्त केले आहे.
तृतीय स्थान रोहित ईश्वरकर या विद्यार्थ्याने प्राप्त केले असून त्याची टक्केवारी 89.83 टक्के तर चौथ्या क्रमांकावर क्षितिजा देशमुख ही असून हिने 87.50 टक्के तर पाचव्या क्रमांकाची विद्यार्थिनी गौरी कराळे 85 .17 टक्के गुण प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. कनिष्ठ महाविद्यालयात एकूण 138 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत बसले होते. त्यातील 137 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
महाविद्यालयातून एकूण तीन विद्यार्थी 90 टक्के च्या वर गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले असून 54 विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत आले आहेत. संस्थेचे अध्यक्ष निशिकांत पुजारी, ज्येष्ठ उपाध्यक्ष बाबासाहेब पाठक, कोषाध्यक्ष तथा कनिष्ठ उपाध्यक्ष अनिल पिंपरखेडे, सचिव रवींद्र अभ्यंकर समवेत प्राचार्य संजय घोगरे, उपप्राचार्य योगेश मल्लेकर, पर्यवेक्षक देवयानी खेडकर समवेत महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.