Tuesday, January 14, 2025
Homeराज्यआकोट विधीज्ञ संघाचे अध्यक्षपदी ॲडवोकेट सुबोध पळसपगार तर सचिव पदी ॲडवोकेट सौ.राधिका...

आकोट विधीज्ञ संघाचे अध्यक्षपदी ॲडवोकेट सुबोध पळसपगार तर सचिव पदी ॲडवोकेट सौ.राधिका देशपांडे विजयी…

आकोट – संजय आठवले

आकोट विधीज्ञ संघाची वार्षिक निवडणूक शांततेत पार पडली असून खेळीमेळीच्या वातावरणात डझनभर मतांची आघाडी घेऊन अध्यक्षपदी ॲडवोकेट सुबोध पळसपगार तर सचिव पदी ॲडवोकेट सौ. राधिका देशपांडे यांनी बाजी मारली आहे. या अध्यक्ष सचिवांची कारकीर्द २०२३ – २०२४ या कालावधीकरिता राहणार आहे.

दिनांक ४ सप्टेंबर रोजी आकोट न्यायालय अंतर्गत आकोट विधीज्ञ संघाची निवडणूक शांततेत पार पडली. आकोट विधीज्ञ संघाचे एकूण १३४ मतदार असून यापैकी १२६ मतदारांनी आपल्या मताधिकाराचा वापर केला. दोन्ही पदांकरिता यातील २ मते अवैध ठरविण्यात आल्याने एकूण मतदान १२४ इतके झाले. यातून ६८, ६८ मते घेऊन अध्यक्षपदी ॲडवोकेट सुबोध पळसपगार आणि सचिव पदी ॲडवोकेट सौ.राधिका देशपांडे यांनी विजय संपादन केला.

अध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार ॲडवोकेट मनोज वर्मा यांना व सचिव पदाचे उमेदवार ॲडवोकेट सुशील खवले यांना ५६, ५६ मते प्राप्त झाली. विजय उमेदवारांनी पराभूत उमेदवारांवर १२ मतांची आघाडी घेतली आहे. या अध्यक्ष सचिवांचा कार्यकाळ २०२३ २०२४ ह्या एका वर्षाचा राहणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ॲडवोकेट डी. एम. कुटे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ॲडवोकेट एस. के. पाठक यांनी दिली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: