सचिवपदी ऍड. शैलेश प्रभू
कुडाळ तालुका वकील संघटनेच्या नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. या नूतन कार्यकारणीच्या अध्यक्षपदी ॲड. सुरेंद्र मळगावकर तर सचिवपदी ॲड.शैलेश प्रभू यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कुडाळ तालुका वकील संघटनेची एक वर्षाने निवड केली जाते. यावर्षीच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी ॲड. सुरेंद्र मळगावकर, उपाध्यक्षपदी ॲड. सुधीर राऊळ, महिला उपाध्यक्षपदी ॲड. रसिका सावंत, सचिवपदी ॲड. शैलेश प्रभू, खजिनदारपदी ॲड. राजीव कुडाळकर यांची निवड करण्यात आली आहे ही निवड बिनविरोध करण्यात आली असून संघटनेच्या सर्व सदस्यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.