Sunday, December 22, 2024
Homeराज्यमहिला व युवकांना प्राधान्य देऊन संघठण उभे करणार - ऍड कविता मोहरकर...

महिला व युवकांना प्राधान्य देऊन संघठण उभे करणार – ऍड कविता मोहरकर यांची माहिती…

आलापल्ली – मिलिंद खोंड

महिला व युवक – युवतींना प्राधान्य देऊन सोबत घेऊन संपूर्ण जिल्ह्यात जम्बो कार्यकारिणी तयार केली असून दक्षिण भागातही कार्यकारिणी तयार झाल्याची माहिती महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ऍड कविता मोहरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ऍड कविता मोहरकर यांनी सांगितले की,मार्च महिन्यात जिल्हाध्यक्ष पद स्वीकारल्यावर संपूर्ण जिल्ह्यातील बाराही तालुक्यात कार्यकारिणी तयार करून मोठी फळी उभी केली असून सध्या दक्षिण भागातील अहेरी विधानसभेचा दौरा करत विविध तालुक्यात कार्यकर्त्यांचा आढावा बैठक घेऊन समस्या जाणून घेत आहे.

या दरम्यान एटापल्ली,अहेरी तालुक्यातील विविध गावांना भेटी देत पक्ष वाढविण्यासाठी काम करत असल्याचे सांगितले.एवढेच नव्हेतर पुढे गडचिरोली कडे जाताना मुलचेरा तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पत्रकार परिषदेला अहेरी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष डॉ निसार हकीम,किसान काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष नामदेव राव आत्राम,अनुसूचित जमाती सेल चे अध्यक्ष मधुकर सडमेक,अल्पसंख्यांक चे अध्यक्ष हनिफ शेख अज्जू पठाण ,महिला काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष सपना नैताम,सचिव वंदना सिडाम,उपाध्यक्ष ज्योती मडावी,रज्जाक पठाण,राघोबा गौरकर,गणेश उपगनलावार आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Milind Khond
Milind Khondhttp://mahavoicenews.com
मिलिंद खोंड, गेल्या 18 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल दुर्गम भागात पत्रकारितेचा अनुभव ..पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी..गोंडवाना विद्यापीठ येथे जन संवाद विभागात गेस्ट प्रोफेसर..तरूण भारत, हिंदुस्थान समाचार,मी-मराठी, न्यूज स्टेट वृत्तवाहिनी चा अनुभव
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: