न्युज डेस्क – संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिली ला १०० वर्ष (शताब्दी) पूर्ण , आणि आई रमाई आंबेडकर यांची १२५ वी जयंती समारोहात पूर्ण भारतातील आंबेडकराइट वकिलान्ना पुरस्कार देउन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तळेगाव,दाभाडे(पुणे) यांनी सन्मानित केले.
महाराष्ट्राचे ऍड.एकता सुशील गणवीर मॅडम यांना “संविधान रत्न” व”आई रमाई” गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंगल्यावर महामनवांना अभिवादन करून सकाळी ९.००वाजता कार व बाईक रैली काढून सभागृहात ११.०० वाजता कार्यक्रम सुरू करण्यात आला.
कार्यक्रमात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिली व्यवसाय आणि संविधान सभा मधे प्रवेश,भारतीय संविधानचे महत्व सांगून कार्यक्रमाचे अध्यक्षा व समिती अध्यक्षा ऍड.रंजना रघुनाथ भोसले ,केतन कोठावल (अध्यक्ष बार असोसिअन पुणे) ऍड. जयदेव गायकवाड (माजी आमदार पुणे) ,ऍड. गौतम चाबुकस्वर (आमदार पुणे), किसन थुल(सचिव) आणि रावले सर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
ऍड.एकता सुशील गणवीर मॅडम यांनी विद्यार्थी जीवनापासूनच बुद्ध,फुले, शाहू , आंबेडकर विचार धारेसी अनेक विद्यार्थ्यांना जोडून जागृत करणे, समस्यांचे निराकरण विविध सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक आणि राजकीय काम करत आहेत.बोधिस्त्व बुध्द विहार संविधान चौक छोटा गोंदिया मधे एक वर्षापासून बाळ संस्कार शिविर घेत आहेत मुलांना माहमानवांची विचारधारा , व मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी आपले वेळ ,श्रम,पैसे,टॅलेंट देत आहेत सामाजिक जवाबदारी समजून.
अर्थव बऊदेशीय संस्था गोंदिया द्वारा ८ मार्च अंतर्राष्ट्रीय महिला दिवस २०२२ ला महिला क्षेत्रामधे उल्लेखनीय काम केल्यामुळे जिल्हा क्रीडा संकुल मारारटोली कडून स्तकार करण्यात आलं,सावित्रीबाई फुले फालोवरस संघटना,गोंदिया मधे २०२० समन्वय साधून गरजू ५० मुलांना शैक्षनिक साईत्य वाटप च कार्य प्रेतेक वर्षी.
या अनुसंघाने ३जानेवारी२०२० ला सन्मानित करण्यात आले, प.पूज्य. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती (२०१७)गोंदिया मधे उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे “पात्र नाटिका “सादर करून त्यांचे संघर्षमय जीवन लोकांपर्यंत आपल्या नाटिका च्या माध्यमातून पोचवतात, कोविड-१९ मधे लोकांना खाद्यपदार्थ ,भोजन,कपडे दिले.
आपल्या वकिली व्यवसाय मधे गरजू लोकांना (पक्षकारांना) निःशुल्क मदत करतात , गाओ गावी जाऊन महिलांना तांच्ये हक्क ,अधिकार,विविध कायदे विषयी जागृत करतात. वृक्षारोपण स्मशानघाट, गाव,न्यायालय मधे वृक्ष लावण्याचे उत्कृष्ट कार्याबद्दल मा.जोतिबा फुले जयंती ने ११एप्रिल २०२३ला सन्मानित केले.
संथागर महिला विंग वर्षवास काळात ३ महिने घरोघरी जाऊन बुध्द धम्मा चा प्रचार – प्रसार संगोष्टी च्या माध्यमातून ,मुलांना चांगले संस्कार मिळावेत म्हणून नागार्जुन बुध्द विहार मोठा गोंदिया आणि आनंद बुध्द विहार संजय नगर गोंदिया ला बाळ संस्कार शिविर घेत आहेत.
संविधान महोत्सव समिती संविधान चौक छोटा गोंदिया ला २६ नोव्हेंबर (संविधान दिवस) जवळपास ३५ वर्षा पासून साजरा करत आहेत या ४ दिवसीय कार्यक्रमात बुद्ध , शाहू ,फुले,बिरसा,आंबेडकर आणि सर्व बहुजन महापुरुषांचे विचार प्रचार प्रसार करण्याचे कार्य करत आहेत.
ऍड.एकता सुशील गणवीर मॅडम यांनी आपल्या वडील सुशिल लालाजी गणवीर यांच्या पासून प्रेरित होऊन आपल्या वडिलांकडून होत असलेले सामाजिक , सांस्कृतिक ,धार्मिक आणि राजकीय कार्य पाहून त्यांच्या सोबत सामाजिक कार्य करत आहेत.
ऍड. एकता सुशिल गणवीर मॅडम ला “संविधान रत्न” “आई रमाई” पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्यावर ऍड.एकता गणवीर मॅडम यांनी आपले आई वडील ,दोन्ही भाऊ, व पूर्ण कुठुंबाला त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद देत बुध्द , शाहू ,फुले आंबेडकर मिशन सी सर्व सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक आणि राजकीय संस्थांना अभीवादन देऊन तांन्या मंगल कामना दिले.