Sunday, December 22, 2024
Homeराज्यखामगाव शहराच्या वैभवात भर टाकणारी नवीन न्यायालय इमारतीस प्रशासकीय मान्यता आमदार ॲड....

खामगाव शहराच्या वैभवात भर टाकणारी नवीन न्यायालय इमारतीस प्रशासकीय मान्यता आमदार ॲड. आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नांना मोठे यश…

हेमंत जाधव

९० कोटी खर्चून नवीन पाच मजली न्यायालयीन इमारतीत राहतील १२ कोर्ट हॉल…

खामगाव येथील न्यायालयाची नवीन इमारत ही खामगावच्या वैभवात भर टाकणारी ठरणार आहे, विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट मा.श्री.आकाश दादा फुंडकर हे खामगाव येथील नवीन न्यायालयीन इमारतीसाठी प्रयत्न करत होते.

त्यांच्या अथक प्रयत्नातून आज दिनांक १४ जुलै २०२३ रोजी खामगाव येथे भव्य न्यायालयीन इमारत मंजुरात झाली आहे. रु.९० कोटी रुपये खर्च करून बनणारी ही इमारत या इमारतीमध्ये तळमजला सह चार मजले राहणार आहेत.

बारा कोर्ट हॉल या इमारतीत बांधण्यात येणार असून खामगाव शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ही इमारत बांधण्यात येणार आहे. खामगाव येथील जुनी न्यायालयीन इमारत अतिशय जर्जर झालेली असून खामगाव येथे नवीन इमारत करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती.

याबाबत सतत पाठपुरावा करून त्यातील त्रुटींची पूर्तता करून आमदार ॲड.श्री.आकाश दादा फुंडकर यांच्या प्रयत्नांना आज दिनांक १४ जुलै २०२३ रोजी अखेर यश मिळाले, खामगाव येथील ही न्यायालयीन इमारत मंजूर झाली आहे.

याबाबत खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.आकाश दादा फुंडकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.नामदार एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब व मा.श्री. उपमुख्यमंत्री अजितजी पवार यांचे जाहीर आभार मानले आहेत. भाजपा महायुतीच्या या सरकारमध्ये संपूर्ण राज्याच्या विकासाची घोडदौड सुरू आहे.

खामगाव विधानसभा मतदारसंघात देखील मागील अडीच तीन वर्षापासून रखडलेली कामे आता मंजूर होत असून येत्या काळात करोडो रुपयांची कामे खामगाव विधानसभा मतदारसंघात मंजूर होणार असून खामगाव शहराच्या वैभवात भर टाकणारी ही कामे असणारच आहेत.

खामगाव येथे मंजूर झालेली न्यायालय इमारत ही देखील अतिशय सुंदर व सर्वसोयीयुक्त असणार आहे. त्यामुळे या इमारतीचा लाभ खामगाव न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या वकिलांना व अशिलांना होणार आहे हे नक्की.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: