भंडारा – विलास केजरकर
भंडारा – लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसार माध्यमांकडे पाहिले जाते. पत्रकार हे शासकीय विविध कल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहचविण्याचे कार्य करत असतात.
मात्र, विविध प्रसार माध्यमात कार्य करणाऱ्या पत्रकाराचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. म्हणून प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देऊन पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याला भरीव निधी उपलब्ध करून द्यावे असे प्रतिपादन पञकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पञे यांनी केले. ते भंडारा येथील शासकीय विश्राम गृहात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पञकार मोरेश्वर ठाकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पञकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पञे, पञकार संरक्षण समितीचे विदर्भ उपाध्यक्ष रविराज घुमे, दैनिक कळंब नगरी वृत्तपञाचे मुख्य संपादक श्रीकांत देशमातुरे, मुख्य संचालक प्रा. प्रदीप घाडगे, विलास केजरकर, निश्चल येनोरकर, सुमित ठाकरे यांच्यासह अनेक पञकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकारितेत पाच वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावे, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावे, पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मृत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे,
असेही मत दैनिक कळंब नगरी वृत्तपञाचे मुख्य संपादक श्रीकांत देशमातुरे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी पत्रकारी क्षेत्रात संपूर्ण आयुष्य वेचून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्राचे पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे, दैनिक कळंब नगरीचे मुख्यसंपादक श्रीकांत देशमातुरे, दैनिक कळंब नगरीचे सह संपादक मोरेश्वर ठाकरे, दैनिक कळंब नगरीचे मुख्य संचालक प्रदीप घाडगे, पत्रकार संरक्षण समितीचे विदर्भ उपाध्यक्ष रवि घुमे इत्यादी मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुस्तके व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आला.
यावेळी विविध बातमीचे लिखान करत असतांना पत्रकारांच्या समस्या वाढल्या आहेत. पत्रकारांच्या आधुनिक काळातील समस्यांवर प्रकाश टाकून उदाहरणासहित मार्गदर्शन करत त्यांच्या संरक्षणात पत्रकार संरक्षण समिती सातत्याने पाठपुरवठा करित असते. असे मत पत्रकार संरक्षण समितीचे विदर्भ उपाध्यक्ष रवि घुमे यांनी केले. आधुनिक काळात पत्रकारितेचे बदलते स्वरुप व आजच्या पत्रकारितेला व्यवसायिक स्वरुप प्राप्त होत आहे.
पत्रकारांनी स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी शोध पत्रकारिता करावी. तसेच जिल्हाचा नाव लौकिक करण्याकरिता जिल्हयातील प्रतिनिधींनी सातत्याने विविध समस्या, चांगल्या, वाईट बातम्याच्या माध्यमातुन लक्ष वेधी लिखान करावे असे मत दैनिक कळंब नगरीचे सहसंपादक मोरेश्वर ठाकरे यांनी व्यक्त केले.
उपस्थित मान्यवरांनी आधुनिक पत्रकारिता व पत्रकार संरक्षण कायदा या विषयावर विचारमंथन करून विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक विलास केजरकर यांनी तर उपस्थितांचे आभार शरद साळवे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पंकज वानखेडे, सुमित ठाकरे, शरद साळवे, सचिन भोयर, सुभाष नागरिकर, अनिकेत देशमातुरे, शुभम बोरकर, विशाल माटे, हर्षल खडसे, बळिराम चामट, विजय मोटघरे व इत्यादी पत्रकार बांधवांनी सहकार्य केले.