रामटेक – राजु कापसे
रामटेक तालुक्यातील बस स्टॉप जवळील देसाई कॉम्प्लेक्स मध्ये आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना शाखा रामटेक तर्फे निर्मिती अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा तसेच उच्च शिक्षण मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन आणि विविध शासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला.
आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचा उद्धार करणे हा प्रत्येक समाजाच्या व्यक्तीचे कर्तव्य आहे. असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्यांच्याच या विचारांच्या पावलांवर पाऊल ठेऊन रामटेक येथे कर्तव्य फाउंडेशन द्वारा निर्मिती अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा उच्च शिक्षण मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्यात आले आहे.
या अभ्यासिकेत समाजातील विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा तसेच उच्च शिक्षण मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कर्तव्य फाउंडेशन द्वारा निर्मिती अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन प्राध्यापक भगवानजी नन्नावरे (संविधान अभ्यासक, नागपूर) यांनी केले.
तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्राईट एज फाउंडेशन (मॅजिक) चे अध्यक्ष श्रीकांत एकुडे प्रमुख अतिथी म्हणून श्री.अनिलजी वाघमारे अध्यक्ष, पत्रकार संघ रामटेक, सुरेंद्र मानमुंडरे, मुरलीधर रंधई, लीलाधर सोनवाने, ज्ञानेश्वर ढोक, प्रमोद घोडमारे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश नन्नावरे, सूत्रसंचालन लीलाधर सोनवाने व प्रदीप सरपाते यांनी केले. तर आभार राकेश चौधरी यांनी मानले. राष्ट्रगीताचे गायन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेच्या सर्व ग्राम शाखेतील पदाधिकारी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाला रामटेक मौदा पाराशिवनी तालुक्यातील माना समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते