माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅराथॉन स्पर्धेला सुरुवात…
अहेरी – आलापल्ली येथील आदिवासी लोकसेवा फाऊंडेशनकडून मागील वर्षीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या स्तुत्य कार्यक्रम राबविण्यात येत आहे,आज त्याचाच एक भाग म्हणून युवक व युवतींकरिता मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या मॅराथॉन स्पर्धे मध्ये युवकांकरिता 1600 मिटर व युवतींकरिता 800 मिटर धावण्याचे आयोजन केले.
या मध्ये प्रत्येकी युवक व युवतींसाठी 3 पारितोषिक ठेवण्यात आले.प्रथम पारितोषिक 2501 रोख रक्कम स्व.मल्लाजी आत्राम स्मूर्ती प्रित्यर्थ माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून तर द्वितीय पारितोषिक 1501 रोख रक्कम स्व.लक्ष्मीबाई मल्लाजी आत्राम स्मूर्ती प्रित्यर्थ माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून तसेच तृतीय पारितोषिक 1001 रोख रक्कम स्व.गोविंदाजी आलाम यांच्या स्मूर्ती प्रित्यर्थ माजी जि.प.सदस्या सौ.अनिताताई दिपकदादा आत्राम यांच्याकडून ठेवण्यात आले.
या मॅराथॉन स्पर्धेचे उद्घाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी हिरवा झेंडा दाखवून केले.या उदघाटन समारंभाला माजी जि.प.सदस्य संजय चरडुके,माजी सरपंच दिलीप गंजीवार,प्रतिष्ठित नागरिक ईश्वर वेलादी,
आविस सल्लागार महावीर अग्रवाल,कोष समिती अध्यक्ष स्वामी वेलादी,ग्रा.पं.सदस्य संतोष अर्का,उमेश आत्राम,महेश सडमेक,संदीप मडावी,सुधीर मडावी, जुलेख शेख,विनोद कावेरी,माजी सरपंच विजय कुसनाके आदी मान्यवर उपस्थित होते.
या मॅराथॉन स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आदिवासी लोकसेवा फाउंडेशनचे प्रतीक गेडाम,रुपेश आत्राम,तिरुपती वेलादी,सूरज मडावी,सुरेश मडावी,दिपक मेश्राम,सूरज मेश्राम,सुनील आत्राम,साईनाथ मेश्राम,
राहुल सिडाम,महेश मेश्राम,सुमित वेलादी,राकेश आलाम,नोमेश आलाम,महेश सडमेक,प्रेम बोरूले, दिपक मडावी,रवी टेकाम, अजय आत्राम,संदीप आत्राम,सत्यवान आत्राम,राकेश आत्राम यांनी अथक परिश्रम घेतले.