राजु कापसे
रामटेक
गोंड गोवारी जमातीचा अभ्यास करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायधीश के एल वडणे अध्यक्षतेखाली सहा महिनेअगोदर गठीत केलेल्या समितीला अहवाल सादर करण्यास सांगितले होते. मात्र या कालावधीत कोणतीही कारवाही न झाल्याने तसेच पुन्हा या समितीला दोन महिन्याची मुदतवाढीचा निर्णय शासनाने घेतल्याने गोंड गोवारी समाजात राज्य सरकारच्या या चालढकल कारभारामुळे तीव्र नाराजी पसरली आहे.
त्यामुळे आज रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांचा कार्यालयात आज सकाळी भर पावसात दोन महिन्यांचा मुदतवाढीचा शासन निर्णय रद्द करावा व आदिवासी शहीद गोवारी स्मारक कन्हान चे सौंदर्यकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दयावा या मागणीसाठी मा. खासदार शामकुमार बर्वे यांना आदिवासी गोंड गोवारी समाज संघटन रामटेक,मौदा,पारशिवनी तालुका व आदिवासी गोवारी (गोंड गोवारी)फाऊंडेशन रामटेक तर्फे निवेदन देण्यात आले.
निवेदणावर मा. खासदार शामकुमार बर्वेनी मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मुदतवाढ रद्द करण्यासाठी विनंती करणार असल्याचे आदिवासी गोंड गोवारी समाज बांधवांना सांगितले.
या प्रसंगी आदिवासी गोंड गोवारी समाज संघटनेचे नागपूर जिल्हा ग्रामीण महासचिव आनंद सहारे,आदिवासी गोवारी(गोंड गोवारी)फाऊंडेशन चे सचिव नंदकिशोर कोहळे,माजी नगरसेवक अनिल ठाकरे, सुखदेव शेंद्रे,ईश्वर गजबे,गणेश राऊत,नरेश राऊत,नरेश कोहळे,प्रेमलाल नेवारे,मुकेश वाघाडे,ईश्वर नेवारे,आकाश नेवारे,श्रावण पचभाये,कृष्णा सहारे,ब्रम्हानंद नेवारे,देवानंद सहारे,अर्जुन बोरजवाडे,नारायण वाघाडे,देवेंद्र राऊत,आयुष सहारे,सागर वाघाडे,राजेन्द्र नेवारे, हिवराज ठाकरे,विलास काळसर्पे,सतिश गाडे, भोलाराम वगारे,सुरेश शेन्द्रे सह बहुसंख्येने जमात बांधव उपस्थित होते.