Tuesday, July 16, 2024
spot_img
HomeMarathi News Todayआदित्य ठाकरे अकोल्यात आले...अन पोहचले चहावाल्याच्या दुकानावर…कोण आहे चहावाला?…

आदित्य ठाकरे अकोल्यात आले…अन पोहचले चहावाल्याच्या दुकानावर…कोण आहे चहावाला?…

राजकारणात चहा हे पेय म्हणजेच मोठा ब्रँड बनलाय असं म्हणायला हरकत नाही, देशात सर्वात मोठ्या राजकीय बैठका चहावरच होतात. तर अकोल्यात ही राजकीय चहाप्रेम बघायला मिळालं, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची सुपुत्र आदित्य ठाकरे हे आज अकोला दौऱ्यावर असतांना थेट एका चहा वाल्याच्या दुकानात भेट दिली तर हे चहावाले शिवसैनिक नसून कोण आहेत ते आपण जाणून घेऊया…

अकोल्यात चहाचा व्यवसाय करणारे मुरलीधर सुर्वे हे शिवसैनिक नसून बाळासाहेबांवर जीवापाड प्रेम करणारे आहेत. यांची मध्यंतरी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जिवापाड प्रेम करणारे म्हणून अशी बातमी प्रसिध्द झाली झाली होती. त्यानंतर या बातमीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीय. आता या चहाच्या दुकानावर आज शिवसेना नेता (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आदित्य ठाकरे यांनी सदिच्छा भेट दिली.

दरम्यान, यावेळी शिवसेना नेते अरविंद सावंत, विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, आमदार नितीन देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकरसह आदी शिवसेने नेते प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी चहा दुकान चालक मुरलीधर सुर्वे अन् दुकानावर काम करणाऱ्या मजुरांसोबत फोटोही काढले, अन् त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तर यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, आज तुमच्यासारखे लोक शिवसेनेवर प्रेम करीत आहेत, त्यामुळ कितीही लोक गेले तरी फरक पडणार नाहीये.

आदित्य ठाकरेसाहेबांनी चहाच्या दुकानावर भेट दिल्याने माझं अख्खं जिवन सफल झालं. साहेबांचे पाय माझ्या दुकानाला लागले, हे खूप मोठं भाग्य समजावे. असे प्रतिक्रिया मुरलीधर सुर्वे यांनी दिली…

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: