नांदेड – महेंद्र गायकवाड
विद्यार्थ्यांनी स्टेटस ठेवण्यास आपला वेळ वाया घालू नये, समाज युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम या समाज माध्यमाच्या आहारी न जाता, शेतकरी कष्टकरी बापाच्या अपमानाचा जागोजागी होणारा बदला घेण्यासाठी युवा पिढीने प्रशासकीय सेवेत अधिकारी व्हावे आणि कुटुंबासह समाजाला न्याय द्यावा, असे प्रतिपादन युट्युब फेम प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ प्रणित छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड च्या वतीने शनिवार ९ सप्टेंबर रोजी कुसुम सभागृह येथे आयोजित मराठा समाजातील गुणवंताचा सत्कार सोहळा कार्यक्रमात प्राध्यापक कांगणे प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव तर उदघाटक म्हणून माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास प्रमुख वक्ता म्हणून युट्युब फेम प्राध्यापक विठ्ठल कांगणे तर प्रमुख अतिथी म्हणून शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्ष आशाताई शिंदे, उद्योजक नरेंद्र चव्हाण, मनपाचे उपायुक्त गिरीश कदम,
महात्मा फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश गुरव, प्रदेश उपाध्यक्ष रामेश्वर काकडे, प्रदेश कोषाध्यक्ष संजय कदम संघटक राजकुमार भुसारे कार्याध्यक्ष गजानन कहाळेकर सचिव देविदास मोरे, कुणबी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार आदींची उपस्थिती होती.
विठ्ठल कांगणे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडविण्यासाठी कुठल्याही राजकारणाच्या मागे न फिरता अभ्यासाकडे सातत्याने लक्ष देऊन आपले ध्येय गाठावे. आपला वेळ वाया न घालता मोबाईलपासून दूर राहून समाजात परिवर्तन घडविण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहनही प्राध्यापक कांगणे यांनी केले.
संस्थापक अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश भाऊ जाधव म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडच्या वतीने विविध समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी यशवंत, गुणवंत, धनवंत होऊन स्वतः समाजाला सक्षम करावे, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
या कार्यक्रमात दहावी, बारावी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या गुणवंत व यशवंतांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोविंद ढाकणीकर, यशवंत आवळे, दत्ता खराटे, संतोष कपाटे, वाघमारे, बाळासाहेब ठाकरे, नामदेव जाधव, विजयताई लुंगारे, मुंजाजी राजगोरे, तिडके यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.