Wednesday, November 13, 2024
Homeराज्यजिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचा तुटवडा दूर करा - पडोळे...

जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचा तुटवडा दूर करा – पडोळे…

विनादबाव आंतरजिल्हा बदल्या गरजेच्या

भंडारा – सुरेश शेंडे

तुमसर : शैक्षणिक सत्र सुरू होऊन २ आठवडे लोटत असताना पालक वर्गातून जिल्हा परिषदेच्या शाळेतील अनेक समस्या तोंड वर करू लागल्या आहेत. शिक्षकांचा तुटवडा त्यातील प्रमुख समस्या असून जि.प. शाळेत विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे समोर आले आहे. त्यातूनच तुमसर मोहाडी विधानसभेत मोडणाऱ्या पालकांची समस्या थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात पोहोचली आहे.

भाजपचे नेते प्रदीप पडोळे यांनी सदर समस्येला वाचा फोडून जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचा तुटवडा दूर करण्यासंदर्भात निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनात जि.प. शाळेत पटसंख्या व इयत्ता निहाय शिक्षक नसल्याने विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे स्पष्ट केले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी सदर निवेदनावर तत्काळ तोडगा काढण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यावेळी पडोळे यांच्या सह भाजपचे मोहाडी तालुकाध्यक्ष भगवान चांदेवार, कुणाल मोहतुरे, संतोष डुंभरे व कार्यकर्ते उपस्थित होते.

विनादबाव आंतरजिल्हा बदल्या- समायोजन गरजेच्या

जिल्ह्यासह तुमसर मोहाडी तालुक्यात जिप च्या शाळा आपल्या दर्जेदार शिक्षणासाठी ओळखल्या जातात. मात्र येथे अनेक शिक्षकांच्या सेवानिवृत्ती नंतर मोठ्या संख्येने पद रिक्त आहेत. त्यावर राजकीय दबाव अथवा अधिकाऱ्यांच्या शिफारशी खपवून न घेता विना दबाव शिक्षकांच्या अंतरजिल्हा बदल्या तसेच वाढीव पटसंख्या ध्यानात ध्यानात घेऊन शिक्षकांचे समायोजन गरजेचे आहे.

शाळेतील भौतिक सुविधांचे मूल्यमापन व्हावे

भाजपचे विधानसभा प्रमूख पडोळे यांनी परब यांच्याशी चर्चा करताना जिल्हा परिषदेच्या शाळेत भौतिक सुविधांचे स्वतंत्र मूल्यमापन व्हावे, पावसाळ्यात अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने वेळीच दक्षता घ्यावी जेणेकरून सरकारी शिक्षण यंत्रणेवर पालकांचा भरवसा भम्मक होईल अशी मागणी त्यावेळी पडोळे यांनी केली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: