कोगनोळी – राहुल मेस्त्री
कोगनोळी (ता.निपाणी ) गावचे सुपुत्र आणि सध्या कोल्हापूर येथे वास्तव्य असणाऱे व कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य अधिकारी म्हणून सेवा बजावणारे कुमार गुंडु कांबळे यांना वसुंधरा सामाजिक सेवा संस्था ,इचलकरंजी यांच्या वतीने भारतीय लोकरत्न स्टार राष्ट्रीय गौरव आँवार्ड 2022, यांचा समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रीत उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार घोषित केला जाते व गौरवाने गौरविले जाते. सदर पुरस्कार वितरण सोहळा कुरूहिन इमारत शेट्टी भवन , निरामय हॉस्पिटल, महासत्ता चौका, इचलकरंजी येथे रविवार दिनांक 2 आँक्टोबर 2022 रोजी सकाळी 11:00 वा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित होणार आहे.