अदानी प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावेत अन्यथा गोंदिया जिल्हा पत्रकार संरक्षण समिति पावर प्लांट समोर करणार आंदोलन…
गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
(गोंदिया) अदानी पावर प्लांट प्रशासनाकडून तिरोडा शहरातील नागरिकांच्या जीवनातील आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण सोयी सुविधांपासून वंचित ठेवण्यात येवून आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. याकडे प्रदूषण नियंत्रक विभाग सुध्दा फक्त डोळे बंद करुन बघण्याची भुमिका असल्याचे जाणवत आहे.
अदानी प्रकल्पामध्ये दगडी कोळसा जडत असल्यामुळे सर्वत्र धुरातून विषारी वायू पसरून प्रदूषणात वाढ झाली आहे. अदानी प्रकल्पाला कोळशाचा पुरवठा ट्रकच्याद्वारे लोक वस्ती असलेल्या तिरोडा शहरातील मुख्य रस्त्याने होत आहे. त्यामुळे जागोजागी कोळशाचा धूर व दगडी कोळसा रोडवर सर्वत्र पसरलेला असल्याने नागरिका, पर्यावरणातील वनस्पती व वन्यजीव यांचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.
युनियन बँक चौकातील रोडवर पसरलेला कोळशाचा धूर त्वरित साफ करण्यात यावा व या चौकात मध्ये दगडी कोळसाचा धूर होणार नाही अशी कायमस्वरूपी उपाययोजना करावी. याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे अन्यथा पत्रकार संरक्षण समिति जिल्हा गोंदिया कडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
अदानी प्रकल्पामध्ये प्रदूषण नियंत्रक मंडळा नुसार इंधन म्हणून वापरात येणाऱ्या दगडी कोळशाच्या ज्वलनानंतर सल्फर डाय ऑक्साईड कार्बन डाय-ऑक्साइड कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन मधील आक्साइट या विषारी वायूचे उत्सर्जन होते.
या विषारी वायू मधील सल्फर डाय ऑक्साईड मुळे डोळ्याचे विविध विकार आणि हवेतील नायट्रोजन मधील डाय-ऑक्साइडमुळे फुफुस व त्वचेचे आजार होतात. कार्बन मोनाकसाइड आणि कार्बन डाय-ऑक्साइड या विषारीमुळे परिसरातील तापमानात वाढ होते. या सर्व कारणामुळे प्रदूषक नियंत्रक मंडळाने नियम सक्तीचे केलेले आहेत.
या सर्व नियमांची काटेकोरपणे पालन करण्याचे अदानी प्रकल्प प्रशासनाला बंधनकारक आहे.परंतु अदानी प्रशासनावर कोणत्याही प्रकारचे बंधन पालन केल्याचे दिसत नाही.त्यामुळे तिरोडा शहरातील नागरिकांच्या आरोग्याकडे डोळे झाक केले जात आहे. तिरोडा शहरातील युनियन बँक चौक या ठिकाणी कोळशाची बारीक कण व कोळशाचा धूर सर्वत्र पसरलेला आहे.
संपूर्ण दिवसभर अनियंत्रित वाहतुकीमध्ये तो धूर उडत असतो.त्या ठिकाणी नागरिकांना श्वास घेणे सुद्धा फार कठीण होत आहे. युनियन बँक चौकामध्ये ब्रेकर बनवण्यात आलेले आहेत. सदर ब्रेकरच्या जवळ पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या बनविणे आवश्यक आहे.परंतु त्या ठिकाणी पट्ट्या आणि इंडिकेटर म्हणून लाईट लावणं आवश्यक आहे परंतु हे न केल्यामुळे कोळशाचे ट्रक स्पीड मध्ये येतात.
त्यामुळे ट्रक मधील कोळसा रोडवर पसरला जातो.आणि सर्वत्र काळे कुठ धूळ हवेत उडत असते. याकडे सुद्धा अदानी प्रशासनाकडून डोळेझाक होत आहे. तिरोडा शहरातील नागरिकांच्या आरोग्याची जीवघेणा खेळ हा अदानी प्रकल्पांकडून खेळला जात आहे यांना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन तहसीलदार, कलेक्टर यांच्याकडून डोळेझाक केली जात आहेत. पर्यावरणातील प्रदूषणाची पातळी सर्रासपणे ओलांडल्या जात आहे.
याकडे त्वरित लक्ष द्यावे अन्यथा पत्रकार संरक्षण समिति गोंदिया रोडवर येऊन आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार संरक्षण समिति जिल्हा अध्यक्ष राजेशकुमार तायवाडे, जिल्हा सचिव रोशन बोरकर, तिरोडा तिरोडा अध्यक्ष श्रावण बरियेकर, उपाध्यक्ष प्रविण शेंडे, सचिव भुपेन्द्र रंगारी, अजय बर्वे, सचिनकुमार पटले, महेंद्र भांडारकर, आरिफ़ पठान यांनी दिलेला आहे.