Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayजगातील श्रीमंतांच्या टॉप २० च्या यादीतून अदानी बाहेर…Hindenberg अहवालानंतर शेअर्स ६०% पर्यंत...

जगातील श्रीमंतांच्या टॉप २० च्या यादीतून अदानी बाहेर…Hindenberg अहवालानंतर शेअर्स ६०% पर्यंत घसरले…

हिंडेनबर्ग अहवाल सार्वजनिक झाल्यापासून मोठे उद्योगपती गौतम अदानी यांच्या निव्वळ संपत्तीला मोठा धक्का बसला आहे. जिथे काही काळापूर्वी ते जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते, आता ते टॉप 20 मध्येही नाही. एवढच नाही तर स्टॉक मॅनिपुलेशन आणि अकाउंटिंग फसवणुकीच्या आरोपांमुळे S&P डाऊ जोन्सने अदानी एंटरप्रायझेसला डाऊ जोन्स निर्देशांकातून काढून टाकले.

ब्लूमबर्गच्या बिलियनेअर इंडेक्सनुसार, गौतम अदानी हे टॉप 20 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले असून सध्या ते 22 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. गौतम अदानी यांचे एका दिवसात सुमारे 10 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, फेसबुकचे संस्थापक झुकरबर्ग यांच्या संपत्तीत $12.5 अब्जची वाढ झाली असून ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 13व्या स्थानावर पोहोचले आहेत.

अदानी यांच्या संपत्तीत $58 अब्जची घट झाली आहे
सप्टेंबरमध्ये अदानीची एकूण संपत्ती155.7 अब्ज डॉलर होती. सोमवारी निव्वळ संपत्ती $92.7 अब्ज राहिली. डिसेंबरपर्यंत, जगातील अव्वल श्रीमंतांमध्ये अदानी हे एकमेव श्रीमंत होते ज्यांच्या संपत्तीत मागील वर्षी मोठी वाढ झाली होती. अदानी आता जगातील सर्वात श्रीमंतांमध्ये 22 व्या क्रमांकावर घसरला आहे.

हिंडेनबर्गच्या अलीकडील अहवालात काय आहे?
25 जानेवारी रोजी हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबत 32,000 शब्दांचा अहवाल प्रसिद्ध केला. अहवालाच्या निष्कर्षांमध्ये 88 प्रश्नांचा समावेश आहे. अहवालात दावा करण्यात आला आहे की समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतला आहे. शेअर्सच्या वाढत्या किमतीमुळे अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी यांची संपत्ती तीन वर्षांत $1 अब्जने वाढून $120 अब्ज झाली आहे, असे अहवालात म्हटले आहे. या कालावधीत समूहातील 7 कंपन्यांचे समभाग सरासरी 819 टक्क्यांनी वाढले होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: