Monday, November 18, 2024
Homeराज्यअदानी गो बॅक!...वीज कामगारांनी दंड थोपटले...हिवाळी अधिवेशनावर वीज कामगारांचा आक्रोश मोर्चा...

अदानी गो बॅक!…वीज कामगारांनी दंड थोपटले…हिवाळी अधिवेशनावर वीज कामगारांचा आक्रोश मोर्चा…

तांत्रिक कामगारांनी सहभागी व्हावे – गोपाल गाडगे

पातूर : महावितरण कंपनीचा महसुलाच्या दृष्टीकोणातुन महत्वाचा असलेला मुलुंड , ठाणे , पनवेल , खारघर , तळोजा , उरण , व जेएनपीटी विभागातील वीज वितरणाचा परवाना अदाणी समुहाला देण्याचा घाट शासनाने रचला आहे. याविरोधात वीज कर्मचाऱ्यांनी दंड थोपटले आहेत.

या मागणी सोबतच ईतर विभाग व महानिर्मिती कंपनीकडील 35 वर्ष आयुर्मान झालेले जल विद्युत केंद्रे खाजगी कंपनीच्या घशात टाकण्याच्या शासन व प्रशासनाच्या निर्णयाच्या विरोधात 22 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशावर यशवंत स्टेडियम नागपुर येथे तिव्र आंदोलन करून कामगार व ग्राहकांमधील निर्माण झालेला आकोश व्यक्त करण्यात येणार आहे.
या आंदोलनामध्ये राज्यातील तांत्रिक कामगारांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तांत्रिक कामगार युनियन र . न . 5059 चे केंद्रीय उपाध्यक्ष गोपाल गाडगे यांनी केले आहे .

तांत्रिक कामगारांचे प्रश्न व मागण्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत . तांत्रिक कामगार हा महावितरण , महापारेषण , महानिर्मीची चा महत्वाचा घटक असुन महसुल वसुल करणारा , विज निर्मीती व वहन करणारा तिन्ही कंपनी ची प्रतिमा व प्रगती साधणारा आहे . कामगारांच्या प्रलंबित मागण्या व प्रश्ना बाबत प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे . मुलुंड , ठाणे , पनवेल , खारघर , तळोजा , उरण , व जेएनपीटी विभागातील वीज वितरणाचा परवाना अदाणी समुहाला तसेच ईतर विभाग खाजगी कंपनीला देऊ नये . या करीता महावितरण कंपनीने विरोध दर्शवावा , महानिर्मिती कंपनीकडील 35 वर्ष आयुर्मान झालेली जल विद्युत केंद्रे नुतनीकरण करून परिचलनासाठी खाजगी उद्योजकांना देण्याचा पाटबंधारे विभागाचा मानस आहे . ती सर्व जल विद्युत केंद्रे महानिर्मिती कंपनीने स्वतः नुतनीकरण करून पाटबंधारे विभागाला जादा पाणी आकार ( रेट ) देऊन आपल्या कडे चालविण्यासाठी ठेवावीत, स्वतंत्र वेतन श्रेणी – तांत्रिक कामगारांना 166 ( P ) नुसार मिळणाऱ्या दोन अतिरिक्त वेतनवाढी चालु वेतन श्रेणी मध्ये वर्ग करून त्यांची कोणताही आर्थिकमार नसलेली स्वतंत्र वेतन श्रेणी लागू करावी , महावितरण कंपनीमधील तांत्रिक कामगारांवर वसुली करीता होणारी दडपशाही व एकतर्फी कार्यवाही त्वरीत थांबवावी घरगुती वाणिज्य , औद्योगिक व शेतीपंप विज ग्राहकांची थकबाकी वसुली करणे करीता असलेली अधिकारी / अभियंता / जनमित्र यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी तसेच तांत्रिक कामगारांचे कामाचे तास निश्चित करावे , दि . 01/04/2019 नंतर कार्यान्वीत झालेले उपकेंद्र खाजगी रित्या चालविल्या जात आहे.

सदरहु उपकेद्रामध्ये त्वरीत कंपनीचे यंत्रचालकांचे पदे मंजुर करण्यात यावे , तांत्रिक कामगारांच्या संख्येनुसार आधुनिक टी . ॲन्ड पी . व सुरक्षा साघणे पुरविण्यात यावे , सन 2018 ते 2023 हया पगार वाढ कराराप्रमाणे वर्ग 3 व 4 मधील तांत्रिक कामगारांना वाढीव इंधन भत्ता त्वरीत लागु करावा तसेच तांत्रिक कामगारांना महीण्याला 20 लिटर प्रमाणे इंधन भत्ता देण्यात यावा , तांत्रिक कामगारांना फिल्डवर काम करण्यासाठी कंपनीच्या वतीने ईलेक्ट्रीकल बाईक पुरविण्यात याव्या , महावितरण कंपनीमध्ये यंत्रचालकांची पदे सरळ सेवा भरती व्दारे न भरता 100 टक्के पदे वर्ग 4 मधील तांत्रिक कामगारांमधुन भरण्यात यावे . कंपनी मधील कार्यरत चतुर्थ श्रेणीतील तांत्रिक कामगारांना महानिर्मीती व महापारेषण प्रमाणे तृतीय श्रेणीमध्ये पदोन्नत करण्यात यावे , प्रलंबित असलेले अनुकंपातत्वावरील प्रकरणे त्वरीत निकाली काढण्यात यावे , राज्य शासनाच्या ईतर 0आस्थापना प्रमाणे तिन्ही कंपनीतील कामगारांच्या विनती / वैद्यकीय / पती – पत्नी एकत्रीकरण बदल्या बाबत तात्काळ कार्यवाही व्हावी , महावितरण कंपनीतील तांत्रिक कामगारांनी पदोन्नती नाकारल्यास उच्च वेतनश्रेणीचे लाभ महानिर्मिती व महापारेषण कंपनीप्रमाणे संरक्षित करण्यात यावा , तिन्ही कंपनीतील उच्च शिक्षित पदवी / पदविकाधारक तंत्रज्ञ / यंत्रचालका साठी अभियंता व ईतर उच्च पदाकरीता Internal Notification भरती प्रक्रीया राबविण्यात यावी , महावितरण व महापारेषण मधील यंत्रचालकांच्या पे प्रोटेक्ट मध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे . त्यामुळे महावितरण मधील यंत्रचालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे .

तरी महापारेषण प्रमाणे महावितरण मधील यंत्रचालकांचे पे प्रोटेक्ट करण्यात यावे , तांत्रिक कामगारांचे सन 2020-2022 व सन 2022-2024 चे रजा रोखीकरण दिलेल्या लेखी आश्वासनानुसार त्वरीत अदा करण्यात यावे , 33/11 के.की. उपकेंद्राला सुरक्षा रक्षक पुरविण्यात यावी , 33/11 के.व्ही . उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेले प्रधान यंत्रचालक व वरिष्ठ यंत्रचालकांचे कामाचे स्वरूप समान आहे त्यामुळे प्रधान / वरिष्ठ यंत्रचालकांची ( विनंती / प्रशासकीय / पदोन्नती ) पदस्थापना करतांना कोणताही दुजाभाव न दाखवता सर्व उपकेद्रामध्ये पदस्थापना देण्यात यावी , प्रत्येक झोन मधील वितरण केंद्र ( शाखा कार्यालय ) व उपविभागीय कार्यालयाची वीज ग्राहक संख्या चे सर्वेक्षण करून कार्यालय संख्येमध्ये वाढ करण्यात यावी , तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावुन घ्यावे तसेच सरळ सेवा भरती मध्ये आरक्षण देण्यात यावे , महापारेषण कंपनीतील तांत्रिक कामगार अधिकारी , कर्मचारी वर्किंग नॉमर्स ठरविण्यात यावे , अपंग कर्मचाऱ्यांना शासन निर्णया प्रमाणे सोयी सवलती देण्यात याव्या , एल.टी.सी.मध्ये आई वडिलांचे नावे समाविष्ठ करण्यात यावे . तसेच सुधारीत दराचा लाम कामगारांना देण्यात यावा , चतुर्थ श्रेणीतील कामगारांचे सॅप अकाऊंट निर्माण करणे बाबत . या ज्वलंत मागण्या व प्रश्न प्रलंबित आहे . प्रशासन धोरणात्मक निर्णय असल्याचे सागुन कामगारांच्या प्रति उदासिन व संघटनेला आंदोलन करण्यास कारणीभुत ठरत आहे .

या आकोश आंदोलनामध्ये राज्यातील तिन्ही कंपनीच्या तांत्रिक कामगारांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तांत्रिक कामगार युनियन चे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे , उपाध्यक्ष बी.आर.पवार , गोपाल गाडगे , सतिश भुजबळ , सरचिटणीस प्रभाकर लहाने , उपसरचिटणीस नितीन चव्हाण , संजय उगले , शिवाजी शिवणेचारी , केंद्रीय संघटक महेश हिवराळे , राज्य सचिव आनंद जगताप , रघुनाथ लाड , केंद्रीय कोषाध्यक्ष गजानन पाटील अघम , मुख्य कार्यालय प्रतिनीधी विक्रम चव्हाण , संजय पाडेकर , तांत्रिक टाईम्स चे संपादक सुनिल सोनवणे , उपसंपादक विवेक बोरकर , किरण कन्हाळे , प्रकाश वाघ आदीनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: