Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayअभिनेत्री तुनिशा शर्मा पंचतत्वात विलीन…एकुलत्या एक मुलीला निरोप देतांना आईचे अश्रू अनावर…

अभिनेत्री तुनिशा शर्मा पंचतत्वात विलीन…एकुलत्या एक मुलीला निरोप देतांना आईचे अश्रू अनावर…

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्यावर आज अंत्यसंस्कार झाला असून तुनिशाच्या मामाने तिला मुख्गानी दिली. या दरम्यान आईने आपल्या मुलीकडे शेवटची नजर टाकताना हंबरडा फोडला. तुनिषाच्या मृत्यूनंतर आई पूर्णपणे तुटली आहे. तुनिषाला शेवटचा निरोप देण्यासाठी कुटुंबीय व टीव्ही जगतातील कलाकार उपस्थित होते.

एवढेच नाही तर तुनिषा प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. आरोपी शीजानने पोलिसांना सांगितले की, त्याचे आणि तुनिषाचे तीन महिन्यांत ब्रेकअप झाले होते आणि दोघांमध्ये वयाचे अंतर होते. शिझानने ब्रेकअप केल्यामुळे तुनिषा नैराश्यात होती. त्यातूनच आत्महत्येचं पाऊल उचललं असल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. तसेच त्याचे इतर मुलींशी संबंध असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तुनिषाच्या अंत्यसंस्कारासाठी शीझान खानची आई व बहीणही उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: