Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayअभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आईचे निधन...मुंबईतील वरळी येथे होणार अंत्यसंस्कार

अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आईचे निधन…मुंबईतील वरळी येथे होणार अंत्यसंस्कार

अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांच्या आई श्रीमती स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी ८.४० वाजता निधन झाले. अशी माहिती माधुरी दिक्षिकचे कौटुंबिक सहकारी रिक्कू राकेश नाथ यांनी दिली. स्नेहलता दीक्षित यांचा घरीच नैसर्गिक मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचवेळी माधुरी दीक्षितनेही याबाबत दु:खद बातमी शेअर केली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ३ वाजता वैकुंठ धाम, डॉ. ई. मोझेस रोड, जिजामाता नगर, वरळी मुंबई येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

स्नेहलता दीक्षित यांच्या निधनानंतर माधुरी दीक्षित आणि त्यांचे पती श्रीराम नेने यांनी निवेदन जारी करत याची माहिती दिली. त्यांनी म्हटलं, “आमची प्रिय आई स्नेहलता दीक्षित यांचं त्यांच्या प्रियजणांच्या उपस्थितीत सकाळी निधन झालं.”

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: