गोंदिया : राजेशकुमार तायवाडे
(गोंदिया) ऑक्टोंबर महिन्यात महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक होणार असून २०१९ च्या निवडणुकीत आपला फार कमी मतानी पराभव झाला तरी खचून न जाता गेल्या साडेचार वर्षापासून मी माझा एकही दिवस फ़ोन बंद ठेवला नाही. मला कोरोना झालेला असतानी सुद्धा मी माझा दुःख न सांगता कोरोनाच्या काळात सुद्धा अनेकांना मदत केली.
मी आणि विकास फाउंडेशनचे कार्यकर्ते हे कोरोनात मदत करतात म्हणून माननीय नितीनजी गडकरी यांनी विकास फाउंडेशन या संस्थेला ५ ऑक्सिजन चे यूनिट दिले, या प्रकारे गेल्या पाच वर्षापासून जनतेच्या सतत संपर्कात राहून सेवा देण्याचा मी आणि माझ्या संघटनेच्या वतीने सतत प्रयत्न करीत आलो आहे.
या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात जे परिवर्तन दिसून आले त्यावरून हे स्पष्ट होते की, अनेक पक्षाचे नाव आणि चिन्ह बदलले पण लोकांनी पक्षाला किंवा चिन्हाला न पाहता नेतृत्वाला पाहून मतदान केल्याचे दिसून आले .भाजपला ज्यांनी मतदान केले ते मोदीजीला पाहून, काँग्रेसला मतदान करतानी ज्यांच्या मनात मोदीजी बद्दल द्वेष होता ज्यांना भाजपचा विरोध होता, सूडाचा राजकारण करुन अनेकांना भाजपने दुखावले म्हणून मतदारांनी रोष व्यक्त केल्याचे दिसून आले.
तुतारीला आणि मशाल ला मतदान करतानी मतदारांनी चिन्ह किंवा पक्ष पाहून मतदान न करता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे नेतृत्व पाहून मतदारांनी मतदान केल्याचे स्पष्ट झाले. एकंदरीत जनतेचे प्रश्न पक्ष किंवा चिन्ह सोडवत नाही, सोडवते तो माणूसच म्हणून व्यक्ती किंवा नेता पाहूनच मतदान करण्याची मानसिकता तयार झाली पाहिजे असे मला वाटते.
मागील निवडणुकीत मी अपक्ष असतानी अनेक माझ्या हितचिंतकांनी पक्षाची तिकीट पाहिजे होती अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या, निवडणूक कमी मतानी हरल्यानंतर त्याच लोकांनी पश्चाताप पण व्यक्त केला होता, ती वेळ येणाऱ्या निवडणुकीत येऊ नये, मी निवडून आल्याचा ज्यांना ज्यांना फायदा होऊ शकतो किंवा मी आमदार आणि जिल्हा परिषदेला तसेच पंचायत समितीला सभापती असतानी ज्या लोकांना माझी मदत झाली अश्यानी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मला येणाऱ्या निवडणुकीत मदत करावी.
कार्यकर्त्यांनी वेळेचा महत्व समजून ही निवडणूक जिंकण्यासाठी निस्वार्थ भावनेने कामाला लागावे तसेच ज्या कार्यकर्त्यांवर जवाबदाऱ्या दिल्या आहेत त्यांनी वेळेच्या आत पूर्ण कराव्या असे आव्हान माजी आमदार चरण वाघमारे यांनी केले आहे.