मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात भावी उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. तर आताच आलेल्या वृत्तानुसार राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. यासाठी आज तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. राज्यात कोणत्या तारखेला निवडणुका होतील आणि विधानसभेची आचारसंहिता केव्हापासून सुरू होईल हे कळेल. भावी उमेदवारांनी या विधानसभेत हैदोस घातला आहे. तर यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये फारच गर्दी झाली असल्याचे दिसत आहे. बाहेर जिल्ह्यातून आलेला पार्सल उमेदवार आता मात्र एकटा पडला आहे, त्याला एकटे सोडून कार्यकर्ते दुसर्या नवख्या उमेदवाराला या मतदार संघात सक्रीय केल्यामुळे हा उमेदवार आता एकाकी झाला. तर पार्सल भावी उमेदवार हा आतापासूनच आमदार असल्यासारखं वागत होता. मतदार संघात याला कोणीच ओळखत नसून हा एका नेत्याच्या भरवश्यावर नवरदेव झाला होता. मात्र त्याला एकाकी पाडल्याने आता आपला बोरिया बिस्तर गुंडाळून परत आपल्या जिल्ह्यात यावे लागणार असल्याचे दिसत आहे. कारण याच्यासोबत असलेले काही नेते आणखी दुसर्या गटात सामील झाले असल्याचे सध्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी पक्षातील काही भावी उमेदवाराने गेल्या ५ ते १० वर्षापासून मतदार संघात लाखो रुपयाची उधळण करून आपले नाव केले. मात्र तेच उमेदवार सध्या दुर्लक्षित आहेत तर या पार्सलचे काय अवस्था होणार? हे न सांगितलेलेच बरे. या जुन्या भावी उमेदवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यासाठी जे केले ते कोणीच केले नाही. एका नेत्याच्या घरचा भाजीपाला पासून ते मुलांची शाळेची फी सुद्धा भरून घेतल्याच्या चर्चा मतदार संघात आहेत. मात्र ऐन वेळेवर त्यांना वाळीत टाकले. तेवढ्यात हे पार्सल उमेदवार आले आणि त्या पार्सल उमेदवाराकडून जेवढ्या हौस पूर्ण करायच्या त्या पूर्ण केल्या आतापर्यंत दहा ते पंधरा लाखाच्या जवळपास खर्च करून घेतला आणि अजूनही सुरूच आहे. आणि त्या पार्सल उमेदवाराला सुद्धा वाटत आहे कि आपल्याच तिकीट मिळणार त्यामुळे तोही हे सर्व सहन करीत आहे. मात्र आता नव्यानेच चर्चा सुरु झाल्या कि हा मतदार संघ काँग्रेसला जाणार? आणि राष्ट्रवादी अकोट मतदार संघ आपल्यासाठी मागणार. त्यामुळे आता मात्र या पार्सलची मोठी गोची झाली आहे. जर कॉंग्रेसला सुटला तर या सर्व भावी उमेदवारांची काय अवस्था होईल?.