Tuesday, November 5, 2024
Homeराज्यलाभार्थ्यांच्या अनुदान खात्यावर होल्ड लावणाऱ्या बँकेवर होणार कारवाई; जिल्हाधिकारी सौरभ कटियार...

लाभार्थ्यांच्या अनुदान खात्यावर होल्ड लावणाऱ्या बँकेवर होणार कारवाई; जिल्हाधिकारी सौरभ कटियार…

लाभार्थ्यांच्या अनुदान खात्यावर होल्ड लावणाऱ्या बँकेवर होणार कारवाई;जिल्हाधिकारी सौरभ कटियार

अमरावती – दुर्वास रोकडे

शासनाव्दारे विविध कल्याणकारी योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान रक्कम जमा केली जातात. शासनाव्दारे दिल्या जाणाऱ्या अनुदानावर बँका होल्ड लावीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. शासनाव्दारे प्राप्त अनुदान खात्यावर होल्ड न लावण्याचे शासनाने व रिझर्व्ह बँकेचे स्पष्ट निर्देश आहे. या निर्देशाचे पालन न करणारे तसेच लाभार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या बँक शाखा व्यवस्थापकावर कडक कारवाई केल्या जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधित बँकाना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे जिल्हयातील विविध बँकेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा अग्रीम बँकेचे व्यवस्थापक श्यामकुमार शर्मा, विभागीय उपक्षेत्रीय प्रमुख सुनील दोहरे, झोनल व्यवस्थापक उमेशकुमार पराते तसेच विविध बँकेचे नोडल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, शासनाव्दारे विविध योजनेतंर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा केल्या जातात. परंतु लाभार्थ्यांच्या खाते होल्ड करीत असल्याचे तक्रारी लोकप्रतिनिधी व नागरिकाव्दारे प्राप्त झाली आहे. शासनाव्दारे दिल्या जाणाऱ्या अनुदानावर बँकेने होल्ड लावणे बेकायदेशीर असून हे अंत्यत गंभीर बाब आहे. अशा खात्यांना होल्ड लावण्यात आल्या असल्यास ते तातडीने काढून टाकावे.

खातेधारकांना व्यवहार करताना येणाऱ्या अडचणी संबंधित बँक शाखा व्यवस्थापकांनी आपल्या स्तरावरच निपटारा करावा. खाते होल्डच्या तक्रारी होणार नाही, याची दक्षता संबंधित बँकेनी घ्यावी. यासाठी संबंधित बँकेनी नोडल अधिकारीची नेमणूक करुन खातेधारकांच्या अडचणीचे समाधान करावे. तसेच पिक कर्जासाठी शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार कर्ज पुरवठा उपलब्ध करुन द्यावा. पिक कर्जाचे दिलेले उद्दिष्ट संबंधित बँकेने मुदतीत पूर्ण करावे, अशा सूचना श्री. कटियार यांनी यावेळी दिले.

खातेधारकांना बँक व्यवहार करताना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी संबंधित बँकेने नोडल अधिकारी घोषीत केले असून त्यांचे संपर्क क्रमांक याप्रमाणे : बँक ऑफ बडोदाचे सुजित खैरे (9404732600), बँक ऑफ इंडियाचे मनहवरलाल कानवर (8871458904), बँक ऑफ महाराष्टाचे अर्जन भौसारी (9096312142), कॅनरा बँकचे मनिष अंम्हे (9175221601), सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्रविण रामबाड (8692966667), इंडियन बँकचे चंदन गायधाने (9970970110),

इंडियन ओर्वसी बँकचे संदिप जालेबर (9572050065), पंजाब नॅशनल बँकचे पंकज डावूलकर (9503614655), स्टेट बँक ऑफ इंडियाचे गौतम बोरकर (7470433322), युको बँकचे अतित्व झा (7366064246), यूनियन बँक ऑफ इंडियाचे प्रशांत काळे (9552733003), एक्सेस बॅकचे वंदना देशपांडे (8600900376), एचडीएफसी बँकचे शैलेश डोंगरे (9689622776), आयसीआयसीआय बँकचे रोशन शेळके (9168684646), आयडीबीआय बँकचे संदिप माकोडे (9922240699), रत्नाकर बँकचे मोहम्मद ईशाद (9373496477), इंदूसिंद बँकचे श्याम जगताप (8983085369), व्हीकेजीबी बँकचे अंजिक्य कानजोडे (8275399254)… 

 

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: