अमरावती – सुनील भोळे
इतवारा परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई उपायुक्त माधुरी मडावी यांच्या उपस्थितीत आज इतवारा परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. यावेळी रस्त्यावरील साहित्य उचलण्यात आले. प्रत्येक दुकानदाराने दोन डस्टबीन ठेवण्याचे निर्देश यावेळी उपायुक्त यांनी दिले. दुकाना पुढील पूर्ण स्वच्छता करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. संबंधित स्वास्थ निरीक्षकाला परिसरातील संपूर्ण स्वच्छता करण्याचेही निर्देश यावेळी देण्यात आले.
इतवारा परिसर संपूर्ण स्वच्छ व्हावा याच्यासाठी या परिसरातील स्वछता कर्मचारी, व्यापारी व हॉकर्स यांनी संयुक्त स्वच्छता मोहीम राबावावी अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. इतवारा परिसरातील भाजी मार्केट मध्ये नालीवर कोणीही दुकान लावू नये असे सक्त निर्देश यावेळी त्यांनी दिले. शहरातील अतिक्रमण, पदपथांवर मुक्काम ठोकणारे फिरस्ते आणि अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून संयुक्त कारवाई केली जात आहे.
या अनुषंगाने उपायुक्त माधुरी मडावी यांनी आज दिनांक १९ जुलै,२०२४ रोजी इतवारा बाजार परिसरातील दुकानदारांची पाहणी केली. पाहणी दरम्यान प्रत्येक दुकानदारांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी दुकानाबाहेरील कचरा आढळून आल्याने सदर दुकानदाराला त्वरीत साफ करण्याचे निर्देश उपायुक्त माधुरी मडावी यांनी दिले. इतवारा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिका धडक कारवाई करत आहे.
यावेळी वैद्यकीय अधिकारी स्वच्छता डॉक्टर अजय जाधव ,सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावरे, बाजार परवाना अधिक्षक उदय चव्हाण, उद्यान अधीक्षक श्रीकांत गिरी, स्वास्थ अधिक्षक श्रीकांत डवरे, स्वास्थ निरीक्षक, अतिक्रमण विभागातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.