पातूर – निशांत गवई
आज दि.२९ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे दोन इसम राखीव वनातून अवैध वृक्षतोड करून सागवान माल पातुर मधील मुजावरपुरा भागात घेवून येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन पातुर मध्ये सापळा रचून सायकलवर अवैध वृक्षतोड केलेला सागवान मालाची वाहतूक करताना एका आरोपीस अटक करण्यात आली.
पातुरमधील सुवर्ण नदीपात्राजवळ दबा धरून बसलेल्या वनकर्मचार्यानी दोन सागवान तस्कर यांना पकडण्याच्या प्रयत्न केला असता त्यांनी कर्मचायीच्या अंगावर सायकल ढकलवून देवून नदीपाराच्या दिशेने धूम ठोकून नदीपात्रात उड्या घेतल्या. .एस. डी. गव्हाणे यांनी आरोपीपाठोपाठ प्रण्यामध्ये उडी घेवून आरोपी नामे सर्फराज खान नूर खान यास पाण्यामध्ये पोहून जात असताना पकडले.
दुसरा आरोपी नामे प्रमोद तायडे, रा. तेलीपुरा पातुर हा अंधाराचा फायदा घेवून पसार झाला. आरोपीकडून जागेवर ७ सागवान चौरस नग व २ सायकली असा एकूण १९,०२६ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून भारतीय बन अधिनियम १९२७ अंतर्गत वनगुन्हा क्र. ०१५८६/०३/२०२४ नुसार वनगुन्हा जरी करण्यात आला आहे.
अटकेतील आरोपी सर्फराज खान नूर खान व फरार आरोपी नामे प्रमोद तायडे हे दोघे नियमित सागवान तस्करी करणारे आरोपी असून यापूर्वीच्या वनविभागाच्या कार्यवाही मध्ये मोक्यावरून पळून जाण्यात यशस्वी झालेले होते. फरार आरोपीचा शोध सुरु असून लवकरच त्यास अटक करण्यात येईल.
आरोपीस पातुर न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपीस ३ दिवसांची वनकोठडी सुनावली. सदर कार्यवाही मध्ये . एस. डी. गव्हाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पातुर, . एन. डी. डाखोरे, वनरक्षक बोडखा-२, . आर. के. बोराळे, वनरक्षक बोडखा-१, . व्ही. बी. सोनुने वनरक्षक पातुर, . ए. व्ही. राठोड यांनी सहभाग घेतला.
कुमारस्वामी एस. आर., उपवनसंरक्षक, अकोला व . सु.अ. वडोदे सहायक वनसंरक्षक, अकोला, . एस. डी. गव्हाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पातुर यांचे मार्गदर्शनात श्री. पी. डी. पाटील, वनपाल, पातुर हे पुढील तपास करीत आहेत.