Monday, December 23, 2024
Homeराजकीयसमाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यावर कारवाई करा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जैलाब...

समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यावर कारवाई करा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जैलाब शेख यांची मागणी…

सांगली – ज्योती मोरे.

अंकलखोप येथील समाज कंठकाने समाज माध्यमावर मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेले अल्लाह व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबत केलेली पोस्ट हे अत्यंत संताप जनक व निषेधार्थ आहे अशा समाज घटकांना वेळीच पोलिसांनी मुस्क्या अवळ्याव्यात भविष्यामध्ये कोणीही गुन्हेगार कुठल्याही धर्माच्या भावना दुखवणार नाही, या समाजकंटकाचा उद्देश काय आहे?

हे पोलिसांनी सहखोल जाऊन चौकशी करावे.कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरयांची जयंती व रमजान ईद,हनुमान जयंती व गुड फ्रायडे अशा विविध सणाच्या पार्श्वभूमीवर जातीय सलोखा बिघडवणारी पोस्ट टाकून संपूर्ण महाराष्ट्रच काय देशभरात समाजामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा अत्यंत संताप जनक व केविलवाना प्रयत्न आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जैलाब शेख यांच्या नेतृत्वाखाली मिरजेचे प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार नारायण मोरे यांना समक्ष भेटून व घडला प्रकार सांगून समाजकंटकाला देशद्रोही सारख्या गंभीर खटले दाखल करावे व पाच किंवा सहा जिल्ह्यातून हातभार करावे अशी मागणी मिरज प्रांताद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली ह्या पोस्टमुळे मुस्लिम समाजाच्या व आंबेडकरी जनतेच्या भावना गंभीरपणे दुखावलेले समाजामध्ये चीड निर्माण झालेली आहे.

याची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी असे निवेदनकर्त्याने संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जैलाब शेख शेख,मातंग समाजाचे युवा नेते गणेश वायदंडे,शिवसेनेचे सागर मेटकरीरी,जमीर शेख,अजय बाबर,साद गवंडी व नासिर शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: