राजू कापसे
दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी तातडीची पत्र परिषद बोलवली. पत्र परिषदेत दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे, भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांना भाजप पक्षाकडून निलंबनाचे पत्र सायंकाळी देण्यात आले.
कोणतीच विचारपूस किंवा चौकशी न करता मला निलंबनाचे पत्र कसे दिले असा सवाल पार्टीला करताना रेड्डी यांनी नाराजी व्यक्त केली. खरे पाहता रामटेक मध्ये भाजपचा झेंडा उभा आहे तो फक्त रेड्डी साहेबांमुळेच. पार्टी चालवताना अनेक अडचणी येत असताना सुद्धा मी पार्टीला जिवंत ठेवले आहे.
मुख्यमंत्र्यांबद्दल मी फक्त माझे मत व्यक्त केले होते, आपले मत सांगणे हे चुकीचे नाही. पक्षाने याबद्दल मला विचारणा करायला पाहिजे होती. सरळ सरळ पक्षाने मला निलंबित करून माझ्यावर अन्याय केलेला आहे. असे माजी आमदार रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. फडणवीस तसेच बावनकुळे यांनी तानाशाही चालवली आहे.
असेही रेड्डी पत्रकार परिषदेत बोलले. कुणाच्या दबावाखाली येऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे याची जाणीव मला आहे याचे विपरीत परिणाम होणाऱ्या निवडणुकीत दिसतीलच असेही ते बोलले. कोणत्याही परिस्थितीत जयस्वाल यांना आम्ही निवडणुकीत पाठिंबा देणार नाही ज्यांना द्यायचा आहे ते तिकडेच थांबतील, बाकी माझ्यासोबत राजीनामे देतील त्यातही कोणावर जबरदस्ती नाही.
आज पर्यंत मी माझे तन मन आणि धनाने पार्टीसाठी काम करत राहिलो. त्याचे मला असे फळ मिळतील याची अपेक्षा मला नव्हती. असे भाजपचे माजी आमदार रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले या पत्रकार परिषदेत करीम मलाधारी, विनायक बानते, नंदकिशोर कोहळे, भोला वघारे, सुखदेव शेंद्रे, ब्रह्मानंद नेवारे,सह पदाधिकारी उपस्थित होते.