सांगली – ज्योती मोरे.
कवठेमंकाळ हद्दीत नागजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई 1 कोटी 34 लाख 9 हजार 700 रुपयांचा गुटखा जप्त.सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची तस्करी करणाऱ्या दोन कंटेनरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं कवठेमंकाळ तालुक्यातील नागज इथं सापळा रचून छापा टाकत 1 कोटी 34 लाख 9 हजार 700 रुपयांच्या गुटखा आणि दोन कंटेनर अशी संयुक्त कारवाई केली.
दरम्यान कंटेनर क्रमांक MH 04 EB 0498 आणि कंटेनर ट्रक क्रमांक MH 12 RN 3203 मधून आंतरराज्य बेकायदा गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती खास बातमीदारांने दिल्यानुसार बसवेश्वर टोपण्णा कट्टीमनी. वय वर्ष – 26, राहणार ;करजगी. तालुका -जत. तिमुराया संगप्पा बगनोळी. वर्षे- 26रा.- करजगी,तालुका- जत.आणि श्रीशैल तमाराया हळके.वय वर्षे -30 राहणार- लहान उमदी, सुसलाद रोड, तालुका- जत.या दोघां चालकांसह एकास पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यांना कवठेमंकाळ पोलीस ठाण्याच्या आवारात आणून अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क करून त्यांना पाचारण करण्यात आले.त्यानुसार अन्नसुरक्षा अधिकारी दत्तात्रय कोळी कवठेमंकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे साहेब, पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांनी सदर कंटेनरची झडती घेतली असता, त्यात पुष्पा गुटका, विमल पान मसाला,व्ही.आय. टोबॅको आणि विमल तंबाखू आढळून आली.
सदर माल कर्नाटकातील विजयपूर येथून तस्करी करून आणल्याचे चालकांनी कबूल केले. यामध्ये दोन कंटेनर मध्ये 1 कोटी 34 लाख 9 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तीनही संशियतांना पुढील तपासाकामी ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे हे करत आहेत .सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली , अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली.