आकोट – संजय आठवले
गणेशोत्सवाचे काळात चोरटी दारू विकणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून खामगाव ग्रामीण पोलिसांनी दोन ठिकाणी देशी विदेशी दारूची चोरटी वाहतूक व विक्री करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडील रुपये ६८ हजार ८३५ किमतीची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे.
खामगाव अकोला मार्गावर अग्रवाल पेट्रोल पंपास समोरून एक किसान अवैध दारूची वाहतूक करीत असल्याचे गुप्त खबरीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी या मार्गावर सापळा रचला त्यावेळी संजय उदेभान तायडे राहणार बाळापुर फाईल खामगाव हा इसम देशी दारु सखु संत्रा कंपनीच्या ९० मिलीच्या ज्यावर बॅच नंबर ४३४ SEP २०२३ असलेल्या कंपनी सिलबंद देशी दारुच्या प्लॅस्टीकच्या ४०० शिशा कि. १४०० रु.
2) देशी दारु सखु संत्रा कंपनीच्या १८० मिलीच्या शिशा ज्यावर बॅच नंबर RV ५१३ SEP २०२३ असलेल्या कंपनी सिलबंद देशी दारुच्या काचेच्या ९६ शिशा कि ६७२० रु. 3) Mcdowells No.1 कंपनीच्या ज्यावर बॅच नंबर 398 L-8 B ३१.०८.२३ असलेल्या विदेशी दारुच्या १८० मिलीच्या २० काचेच्या शिशा कि. ३००० रुपये, 4) एक नग पांढरी पोतडी
5) सुझुकी अॅसेस मोटार सायकल क्र. MH-28-AX-3538 कि. ४०००० रुपये अशी एकुण ६३७२० रुपये ची दारू मोटरसायकल द्वारे वाहतूक करताना आढळून आला त्याला अटक करून व हा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दुसऱ्या प्रकरणात ग्राम हिंगणा कोरेगाव तालुका खामगाव येथे अवैध दारू विक्री होत असल्याचे गुप्त खबरे वरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी येथे छापा घातला त्यावेळी स्वरूप दिगंबर चव्हाण राहणार हिंगणा कोरेगाव येथील बस स्टॉप वर अवैध दारू विक्री करताना आढळून आला त्याचे कडून देशी दारु टंगो पंच असे लिहलेल्या ९० मिली च्या ज्यावर बॅच नंबर RV 418 AUG 2023 असे लिहलेल्या कंपनी सिलबंद ३९ नग देशी दारुच्या प्लॅस्टिकच्या शिशा किं. १३६५ रु.
2) Medowells No. 1 कंपनीच्या ज्यावर बॅच नंबर 398 L-8 B 31.08.2023 असलेल्या विदेशी दारुच्या १८० मिलीच्या २५ नग काचेच्या शिशा कि. ३७५० रुपये च्या असा एकुण ५११५ रुपये किमतीचा मुद्देबाल जप्त करण्यात आला त्याला अटक करून नियमानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागिय पोलीस अधिकारी, खामगांव यांचे पो.उप.नि. मनोज वासाडे, पो.हे.कॉ. सुधाकर थोरात, पो. कॉ. सचिन सदाफुले यांनी केली.
अशाप्रकारे चोरट्या दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कारवाई होत असली तरी त्या पुढील तपास मात्र काळजीपूर्वक होणे गरजेचे आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आजवर अशा असंख्य लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. परंतु या संदर्भात मात्र पुढील तपास कोणतेही पोलिस करीत नाहीत. त्यामुळे ही दारू कोठून आणली हे सिद्धच होत नाही.
वास्तविक ज्या दारु दुकानदारांनी या लोकांना ही दारू विकली त्यांचेवरही कारवाई होणे गरजेचे आहे.असे झाल्यासच अशा प्रकारे अवैध दारूची वाहतूक व विक्री या प्रकाराला आळा घालता येणार आहे. परंतु दुर्दैवाने अशी कारवाई अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही होताना आढळून येत नाही. त्यामुळे चोरट्या दारू वाहतूक करणाऱ्यांवर अथवा विक्रेत्यांवर कारवाई होत असली तरी ही दारू या लोकांना विकणाऱ्या देशी दारू दुकानदारांना मात्र पोलिसांद्वारे अभय देण्यात येत असल्याचे दिसत आहे.