आकोट – संजय आठवले
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून कत्तली करिता बाळगून ठेवलेल्या ८ गोवंशांची आकोट ग्रामीण पोलिसांनी सुटका केली असून याप्रकरणी दोन आरोपींवर रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचेकडून २ लक्ष ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २७.०६.२०२३ रोजी पोलीस स्टेशन आकोट ग्रामीण जि. अकोला येथे गुप्त बातमीदाराने माहिती दिली की, आकोट ते बोर्डी मार्गावरील नागापुर शिवारातील अब्दुल जलील यांचे शेताजवळील ई क्लास जागेवर गोवंश जातीचे बैलांना कत्तलीसाठी आणुन बांधुन ठेवलेले आहेत.
अशा खात्रीलायक माहितीवरून पोलीस स्टाफने पंचासह जावुन आरोपी नामे मोहम्मद इकबाल अब्दुल समद, वय ३५ वर्ष, रा. मोमीनपुरा, आकोट जि. अकोला याचेकडून ४ गोवंश जातीचे बैल किं. अं. १,४०,०००/-रु, आणि आरोपी २) सै. आसिफ सै. बिलाल, वय ५० वर्ष, रा. छोटीबुराख, आकोट ह. मु. फातीमा मस्जीद हाजीनगर, आकोट जि. अकोला याचे जवळून गोवंश जातीचे २ बैल व २ गो-हे किं.अं. १,२५,०००/- रु असा एकूण २,६५,०००/- रु चा मुद्येमाल पंचासमक्ष ताब्यात घेतला.
आरोपी क्र. ०१ व ०२ यांचेजवळुन एकुण ८ गोवंश जातीचे ६ बैल व २ गो-हे कत्तल करण्याच्या उददेशाने बाळगतांना मिळुन आले. त्यामूळे आरोपीतांविरुदध पोलीस स्टेशनला अप नं २५०/२०२३ कलम ५ (अ), ९ महा. प्राणी संरक्षण अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई सहा. पोलीस अधिक्षक रितु खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी आकोट यांचे मार्गदर्शनाखाली आकोट ग्रामीण पोलीस स्टेशन चे प्रभारी ठाणेदार सहा. पोलीस अधिक्षक सुरज गुंजाळ, एएसआय दादाराव लिखार बनं ६२१, पोहेकॉ उमेशचंद्र सोळंके बनं ०३, पोहेकॉ वासुदेव ठोसरे बनं ९७८, पोहेकॉ हरिष सोनवणे बनं १७१७, पोकों शैलेश जाधव बनं १२८८, पोको सागर नागे बनं २६३, पोकों सचिन कुलट बनं ६६९,, पोकॉ नंदकिशोर नेमाडे बनं २०२४ यांनी केली.