Monday, December 23, 2024
Homeराज्यकुंडलवाडी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईने बिलोली तहसीलच्या महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह..?

कुंडलवाडी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईने बिलोली तहसीलच्या महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह..?

नांदेड – महेंद्र गायकवाड

बिलोली तालुक्यात मोठया प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन होत असून नागणी येथील मांजरा नदी पात्रातून अवैध रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर कुंडलवाडी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने 23 मार्च रोजी पहाटे कारवाई केल्यानंतर बिलोली तहसीलच्या महसूल विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे.

गेल्या अनेक दिवसापासून शासनाचे लाखो रुपयांचे महसूल या अवैध रेती उत्खननाने बुडत असून अवैध धंदेवाल्यांशी हातमिळवणी करणाऱ्या महसूलच्या अधिकाऱ्याची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यातून होत आहे.

कुंडलवाडी लगत असलेल्या मलकापूर मंदिरा जवळ नागणीच्या मांजरा नदीपात्रातूनदि.२३ मार्च रोज सकाळी ६ वाजता ट्रॅक्टर क्रमांक एम. एच.२६ टि.एच.८९३अवैध रेती उपसा वाहातूक करीत असताना कुंडलवाडी पोलिस व एल.सी.बी.पथकानी केलेल्या कारवाईत एक ब्रास रेती व ट्रक्टर असे एकंदरीत तीन लाख पाच हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आणि मंडळअधिकारी अंबेराय यांनी रितसर पंचनामा केला.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी मुंडेराव रघुनाथ करले यांनी दिलेल्या फियार्दीवरून आरोपी दत्ता कोपरे, दत्ता शिंदे दोघेही रा. हरनाळी यांच्याविरूद्ध कुंडलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे मुंडेराव रघुनाथ करले पोहेकॉ तसेच सपोनि.

संतोष शेकडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस वहान चालक नागेंद्र कांबळे, पोलिस नायक मिलिंद नरबाग, आदींचा सहभाग होता. पुढील तपास बिटजमादार शंकर चव्हाण करीत आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाई नंतर महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून एवढ्या मोठया प्रमाणात अवैध रेती उत्खनन होत असताना महसूलचे पथक काय करीत होते.

दररोज होणाऱ्या या अवैध रेती उत्खननामुळे शासनाचे लाखो रुपयांचे महसूल बुडाले आहे. यास जबाबदार कोण..? महसूल अधिकाऱ्याची चौकशी करावी अशी मागणी होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या महसूल अधिकाऱ्याची बदली केल्यास अवैध रेती वाहतुकीस आळा बसेल.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: