राजधानी दिल्लीत एका मुलाने शाळकरी मुलीवर अॅसिड फेकले आहे. दिल्लीतील द्वारका भागात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या विद्यार्थ्याला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी मुलगा मुलीला आधीपासूनच ओळखत होता. ही विद्यार्थिनी बारावीची विद्यार्थिनी असून, ती शाळेत जात असताना आरोपीने ही घटना घडवली. यातील दोषी असणाऱ्यांना तिघांना द्वारका पोलिसांनी पकडले असल्याची माहिती DCP एम हर्षवर्धन यांनी ANI वृत्तसंस्थेला दिली आहे.
या घटनेबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, द्वारका जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीवर एका मुलाने अॅसिड फेकले आहे. ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली. मुलीला सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहे.
घटनेच्या वेळी मुलगी तिच्या लहान बहिणीसोबत होती. तिच्या ओळखीच्या 2 लोकांवर तिने संशय व्यक्त केला आहे. आताच मिळालेल्या माहितीनुसार तिघानाही ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ठाण मोहन गार्डन परिसरात एका मुलीवर अॅसिड हल्ला झाल्याच्या घटनेबाबत सकाळी नऊच्या सुमारास पीसीआर कॉल आला.दोन दुचाकीस्वारांनी एका १७ वर्षीय मुलीवर अॅसिड सदृश पदार्थाने हल्ला केल्याचे सांगण्यात आले. सकाळी 7:30 चा वापर करून हल्ला केला. मुलीवर उपचार सुरू असून प्राथमिक अहवालानुसार तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर पीडितेच्या पालकांनी सांगितले की, विद्यार्थिनी 17 वर्षांची अल्पवयीन आहे. सकाळी ७.२९ वाजता ती लहान बहिणीसोबत शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली. कुटुंबीयांनी सांगितले की, मुली घरापासून काही अंतरावर आल्या असताना दुचाकीवरून आलेल्या दोन मुखवटा घातलेल्या मुलांनी पीडितेच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले आणि पळून गेले. दुसरीकडे, कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलीच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात अॅसिड गेले आहे, पीडितेने कधीही कोणत्याही मुलाकडून छळ होत असल्याचे सांगितले नाही.