Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | घरफोडी करून मुद्देमालाची विल्हेवाट लावणारच होता...शिताफीने सापळा रचून केले जेरबंद...परतवाडा...

अमरावती | घरफोडी करून मुद्देमालाची विल्हेवाट लावणारच होता…शिताफीने सापळा रचून केले जेरबंद…परतवाडा पोलीसांची कारवाई…

अमरावती | जिल्ह्यातील परतवाडा येथील पोलिसांनी चांगली कामगिरी बजावीत घरफोडी करणारा चोरट्याला जेरबंद केले. रोशन किरण सरदार, वय २५, असे आरोपीचे नाव असून तो परतवाडा येथील रहिवाशी आहे. त्याच्याकडून सोन्या व चांदीचे दागीने अंदाजे किं.२,०२,६९०/- रुपये जप्त करण्यात आले आहे.

अमरावती ग्रामिण जिल्हयातील पोलीस स्टेशन परतवाडा येथील फिर्यादी नामे ओकांर साहेबराव पवार, रा. शिवाजी नगर, परतवाडा यांनी दि. २७/०४/२०२३ रोजी पोलीस स्टेशन ला येवून तक्रार दिली की, ते त्यांच्या कुटुंबीयांसह दि. २६/०४/२०२३ रोजी कामानिमित्त अमरावती येथे गेले असता. रात्री दरम्यान कुणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे घराचा दरवाज्याचा कुलुप कांडा तोडुन आत प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागीने (एकदानी, पोत, कानातील झुमके, अंगठी, नाकाची नथ.) किं. अं.१,६८,६००/- रू तसेच चांदीचे दागीने (हातातील कडे ३, बांगड्या ४, ब्रासलेट, कमरेचा आकडा, पेजन, कमरबंध ई.) किं.अं.३४,०९०/- रु असा एकुण २,०२,६९०/- रूचा चा मुद्देमाल चोरून नेला.

प्राप्त तक्रारीचे आधारे पो.स्टे. परतवाडा येथे घरफोडीचा गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला अश्या प्रकारच्या घरफोडीच्या घटनांना त्वरीत आळा बसण्याकरिता व घडलेल्या गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मा. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांनी परतवाडा पोलीसांना सूचना निगमीत केल्या होत्या.

दि. २९/०४/२०२३ रोजी परतवाडा पोलीसांचे पथक गस्त करित असतांना गोपनिय माहीती प्राप्त झाली की, सदर गुन्हा हा परसरातीलच सराईत गुन्हेगार आरोपी नामे रोशन किरण सरदार, वय २५, रा. परतवाडा यांने केला असून सद्या सदर आरोपी हा मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याचे तयारीत आहे, प्राप्त माहीतीची शहानिशा करून पथकाने आरोपी राहत असलेल्या ठिकाणी सापळा रचुन शिताफीने त्यास अटक केली आहे.

सदर आरोपीने वरील तक्रारदार यांचे घराचे कुलूप कोंडा तोडून चोरी केली असल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीचे ताब्यातुन चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल (सोन्या व चांदीचे दागीने) किं.२,०२,६९०/- रूचे जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास परतवाडा पोलीस करित आहे.

“सदरची कार्यवाही मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती प्रा. श्री. शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती प्रा. श्री. अतुलकुमार नवगीरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अचलपुर यांचे मार्गदर्शनात श्री. संदीप चव्हाण, ठाणेदार पो.स्टे. परतवाडा यांचे नेतृत्वातील पो.उप.नि. श्री. कदम, पोलीस अमलदार सुधीर, मनीष काटोलकर, सावलकर, बाबील, घनश्याम यांचे पथकाने केली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: