सांगली – ज्योती मोरे
यशवंत नगर चौकातील दाबेली विक्रेत्या तरुणावर हल्ला करून अज्ञातांकडून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. सदर घटनेतील आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि एमआयडीसी पोलिसांना यश आले. माधवनगरातून पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपींना पकडण्यात आले.
यामध्ये यश प्रशांत सौंदडे. वय वर्ष 19, राहणार – यशवंत नगर,विजया प्राथमिक शाळेमागे अंबा चौक, सांगली. प्रतीक उर्फ पप्पू संभाजी वगरे.वय वर्षे 19 ,राहणार- निरंकार कॉलनी,संजय नगर, सांगली. आणि एका अज्ञात बालकास ताब्यात घेण्यात आले.सदरचा गुन्हा घोडा गाडी शर्यतीमध्ये झालेल्या जुन्या वादातून केल्याचं आरोपींनी कबूल केले.
सदर आरोपींना एमआयडीसी कुपवाड पोलिसांकडं वर्ग करण्यात आले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली,अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे,
पोलीस उपनिरीक्षक विशाल खेडेकर, पोलीस आमलदार,पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल पोलीस हेडकॉन्स्टेबल मगदूम, पोलीस हेड कॉन्स्टेबल खोत, पोलीस हेड कॉन्स्टेबल धोत्रे, पोलीस हेडकॉन्स्टेबल खोत, पोलीस कॉन्स्टेबल गट्टे,पोलीस कॉन्स्टेबल जाधव आदींनी केली आहे.