Sunday, December 22, 2024
Homeराज्यविनयभंग प्रकरणात आरोपीस सश्रम कारावासाची शिक्षा...

विनयभंग प्रकरणात आरोपीस सश्रम कारावासाची शिक्षा…

पातूर – निशांत गवई

पातूर न्यायलाय येथे विनयभंग प्रकरणात आरोपी यास सश्रम कारावास चि शिक्षा थोठावण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे कि तालुक्यातील ग्राम माझोड येथील आरोपी श्रीकृष्ण विलास पुंडे हा शेजारी राहत असलेल्या महिलेला दारू पिऊन अश्लील शिवीगाळ करून व हात पकडून अश्लील बोलत असतांना फिर्यादी महिला ने आराडाओरडा केला असता शेजारील महिला आल्या असता त्या महिलांना सुद्धा अश्लील शिवीगाळ करत जिवाने मारण्याची धमकी दिली होती.

याबाबत पीडित महिलेने 30/5/2010 ला पातूर पोलिसांत तक्रार दाखल करून आरोपी श्रीकृष्ण विलास पुंडे यांच्या विरुद्ध अप नंबर 78/2010 कलम 354,294 भादवी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या बाबत न्यायलयाने 354 कलम नुसार आरोपी यास पाच महिने सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावास तथा 294 कलम प्रकरणी एक महिना सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड दंड न भरल्यास पाच दिवस सश्रम कारावास चि शिक्षा पातूर न्यायालय चे न्यायाधीश कैलास कुरुंदळे यांनी थोठावली असून या प्रकरणी पीडित महिले तर्फे सरकारी वकील ऋषिकेश जुनारे, ऍड. नियात अहेमद यांनी काम पाहिले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: