अकोला – संतोषकुमार गवई
अकोला दि१५स्थानीक गुन्हे शाखा, अकोला येथील पोउपनि गोपाल जाधव व पथकास येणाऱ्या बकरी ईद सना निमीत्याने अवैधधंद्यावर कार्यवाही करणे बाबत पो.नि श्री. शंकर शेळके यांनी आदेशीत केले असता पथक हे बाळापूर उपविभागात अवैधधंद्यावर रेड करणे कामी पेट्रोलींग करीत असता, त्यांना गोपनिय माहीती प्राप्त झाली की एक ईसम हा उरळ हद्दीतील कवठा गावाचे जवळ त्याचे ताब्यात गावठी पिस्टल बाळगून आहे.
अश्या मिळालेल्या माहीती वरून पथकाने माहीतीचे गांभीर्य पाहून सापळा रचून गावठी पिस्टल बाळगणाऱ्या ईसमास शिताफीने ताब्यात घेवून आरोपी नामे रघूविर तेलसिंग चौहाण वय ३० वर्ष रा. फुकट पुरा जलाराम मंदीर जवळ जळगाव जामोद जि. बुलढाणा याचे जवळील एक गावठी पिस्टल (अग्निशस्त्र ) ०५ जिवंत काडतुस त्याचे कडील वाहन व ईतर साहीत्य असा एकुण ७१,०००/-रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरूध्द कलम ३,२५ आर्म अॅक्ट सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात येत असून आरोपीस पुढील तपास कामी पो. स्टे उरळ यांचे ताब्यात देण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब, पो.नि श्री. शंकर शेळके स्थागुशा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा अकोला चे पोउपनि. गोपाल जाधव, पो. अंमलदार रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, गोकूळ चव्हाण, वसीम शेख, भिमराव दिपके, चालक पो. हवा अक्षय बोबडे यांनी केली आहे.