Sunday, December 22, 2024
Homeराजकीयमेळघाटातल्या मौसम सुहानाचे गीतात तंतोतंत वर्णन - आमदार ॲड.यशोमती ठाकूर...

मेळघाटातल्या मौसम सुहानाचे गीतात तंतोतंत वर्णन – आमदार ॲड.यशोमती ठाकूर…

अमरावती – दुर्वास रोकडे

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे. या परिसरातील निसर्ग सौंदर्याचे तंतोतंत वर्णन मौसम सुहाना या गीतात झाले आहे. नुकतेच मेळघाट मध्ये चित्रीकरण झालेल्या गीताच्या पोस्टरचे आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

मौसम सुहाना या सदाबहार गीताचे नुकतेच मेळघाटातील अतिशय रम्य अशा परिसरात चित्रीकरण करण्यात आले. अतिशय सुंदर असे हे गीत असून चित्रीकरण सुद्धा अत्यंत अप्रतिम करण्यात आले आहे. अमरावती मधील कलाकारांनी या गीता मध्ये तांत्रिक बाजू सांभाळली असून मेळघाटाचे अप्रतिम सौंदर्य या गीतात चित्रीकरण करण्यात आलेलं आहे. या गीताच्या पोस्टरचे आज आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

या वेळी आमदार यशोमती ताईंनी सर्व टीमचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या टीम कडून यापुढेही चांगले काम केले जाईल, अशी आशा सुद्धा त्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी गीताचे दिग्दर्शक अश्विन वाकोडे, निर्माते प्रशिक मोहोड, अभिनेत्री साक्षी पखान, रवी वानखडे, बेझोननसचे प्रतीक गावंडे, मयूर ओगले, मयुरी भोकसे, नृत्य दिग्दर्शक उमेश गजभिये, सुरज पांडे ही संपूर्ण टीम उपस्थित होती.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: