आकोट – संजय आठवले
शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्याकरिता राज्यात नाफेडचे वतीने शेतकऱ्यांची नाव नोंदणी करणे सुरू झाले आहे असून ह्या नाव नोंदणी करिता नाफेड केंद्रांवर शेतकऱ्यांनी एकच झुंबड केली आहे. यंदा बाजारात व्यापाऱ्यांकडून हरभऱ्याला ४,६०० ते ४,७०० चा भाव दिल्या जात आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीकरिता नाफेडला पसंती दिली आहे.
गतवर्षी नाफेडने हरभऱ्याला ५२०० चा भाव दिला होता. यावर्षी त्यात १३० रुपयांची भर घातली गेली आहे. त्यामुळे यंदा ५३३० रुपये असा भाव मिळणार आहे. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही हेक्टरी १५ अर्थात एकरी सहा क्विंटल चा मापदंड ठेवण्यात आला आहे. या मापदंडानुसार येत्या १४ मार्चपासून प्रत्यक्ष खरेदी सुरू होणार आहे.
कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार हरभऱ्याची राज्यातील जिल्हा निहाय उत्पादकता निश्चित केली गेली आहे. त्यानुसार हरभरा खरेदी केली जाणार आहे. शासनाने ठरवून दिलेली जिल्हा निहाय उत्पादकता पुढील प्रमाणे– ठाणे ८.००, पालघर ६.७५, रायगड ९.६०, रत्नागिरी ४.९०, सिंधुदुर्ग ००, नाशिक ९.८५, धुळे १०.५०, नंदुरबार १२.३४, जळगाव १३.५०,
अहमदनगर ११.५०, पुणे १२.५०, सोलापूर ८.४६, सातारा ११.००, सांगली १०.१२, कोल्हापूर १२.२५, औरंगाबाद ८.००, जालना १४.५५, बीड १५.००, लातूर १३.००, उस्मानाबाद ११.५०, नांदेड १५.००, परभणी १२.५०, हिंगोली १२.००, बुलढाणा १२.९४, अकोला १५.००, वाशिम १२.६५, अमरावती १५.००, यवतमाळ १३.५०, वर्धा १३.५०, नागपूर १५.००, भंडारा १२.००, गोंदिया ८.९६, चंद्रपूर ७.५० गडचिरोली ३.८२.