पातूर : शहरात राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर शहरात राहत असलेल्या एका युवकाने अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना दिनांक दोन मे रोजी घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि शहरातील एका शाळेत सहाव्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर ती शाळेत जात असतांना वाईट उद्देशाने पाठलाग करायचा तसेच दोन तारीख ला घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत घरात शिरून आरोपी ने अल्पवयीन मुलीचा हात पकडून जवळ ओढून तिचा विनयभंग करून माझे तूझ्या वर प्रेम आहे तू नकार दिल्यास तूझ्या अंगावर ऍसिड फेकून देण्याची धमकी दिली.
सदर घटने मुळे अल्पवयीन मुलगी घाबरून गेली सायंकाळी घरी आई आली असता तिला घडलेला अतिप्रसंग कथन केला असता सविस्तर घटनेमुळे मुलीच्या आईने पातूर पोलीस स्टेशन गाठून झालेल्या घटने बाबत तक्रार दाखलं करून आरोपी शेख सोहेल उर्फ राजू शेख ईमाम वय 22याचे विरुद्ध अप नंबर 226/23 कलम 452,354(ड )506 भादवी सहकलम 8,12 पास्को नुसार गुन्हा दाखलं करण्यात आला असून ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शन खाली सहा. ठाणेदार मिरा सोनुने यांनी आरोपी शेख सोहेल उर्फ राजू शेख ईमाम यास अटक केली असून वृत्त लिहिस्तोवर आरोपी यास न्यायालयात हजर करण्याचि प्रक्रिया सुरु होती