Monday, December 23, 2024
HomeBreaking News"तुझ्यात जीव रंगला" फेम अभिनेत्री कल्याणी जाधव हीचा अपघाती मृत्यू...

“तुझ्यात जीव रंगला” फेम अभिनेत्री कल्याणी जाधव हीचा अपघाती मृत्यू…

प्रसिध्द टिव्ही अभिनेत्री कल्याणी कुरुळे जाधव हिचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. अत्यंत कमी वेळामध्ये आपली वेगळी छाप सोडणाऱ्या कल्याणीच्या मृत्यूच्या बातमीने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.तिच्या अशाप्रकारे अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा आर्श्चयाचा धक्का बसलाय. सुरूवातीला अनेकांना ही फक्त अफवा असल्याचे देखील वाटले होते.

मध्यरात्री कोल्हापूर सांगली रस्त्यावरील हालोंडी फाटा इथे डंपरने धडक दिल्याने कल्याणीचा मृत्यू झाल्याचे कळते आहे. तुझ्यात जीव रंगला, जीव माझा गुंतला यासह अन्य मालिकेत कल्याणी जाधवने जबरदस्त भूमिका केल्या आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर कल्याणीने एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

काही दिवसांपूर्वीच कल्याणी जाधव हिने हालोंडी फाटा येथे प्रेमाची भाकरी नावाने एक हाॅटेल सुरू केले होते. मध्यरात्री हॉटेल बंद करून घरी परतत असताना डंपरने धडक दिल्याने कल्याणीचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली असून, कोल्हापूर-सांगली मार्गावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. त्यामध्येच आता अभिनेत्री कल्याणी हिचाही मृत्यू झाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: