Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीनिंबा फाटा - शेगाव मार्गावर अपघाताचे सत्र सुरूच...

निंबा फाटा – शेगाव मार्गावर अपघाताचे सत्र सुरूच…

नया अंदुरा – शेगाव ते अकोट मार्गावर निंबा फाटा परिसरात काल गुरुवारी दुपारी झालेल्या अपघातात भरधाव कार उलटून एकजण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आज शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास पुन्हा अपघात झाला. भरधाव कार समोरील दुचाकीवर आदळल्याने दोन वाहनांचे नुकसान झाले असून या अपघातात दुचाकीवर असलेले दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे.

यामध्ये पतीची प्रकृती चिंताजनक आहे. उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंबा फाटा येथून जवळच असलेल्या कवठा फाट्यावर काल गुरुवारी अपघात झाला. कार उलटल्याने कार मधील एक युवक ठार झाला होता. आज पुन्हा याच ठिकाणी अपघाताची घटना घडली आहे. त्यामुळे या मार्गावरील धोकादायक वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास एमएच २१ एएक्स ८८३३ ही कार शेगाव येथून अकोटकडे भरधाव वेगाने जात असताना या कारने समोरुन येणाऱ्या एमएच २८ यू ७६५७ या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. हे पती पत्नी निंबा येथून शेगावच्या दिशेने जात होते.

या अपघातात पत्नीचा पाय दुखापत असून पतीही गंभीर जखमी झाला आहे. दोघांनाही शेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच निंबा फाटा पोलीस चौकीचे पोलीस बैस यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरीक व पोलीसांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रवाना करण्यात आले. जखमी झालेले दाम्पत्य हे बुलडाणा जिल्ह्यातील असून वृत लिहीपर्यंत त्यांची नावे कळू शकली नाही.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: