नासिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील अक्राळे फाट्याजवळ एसटी बस व बलेनो कार या दोन वाहनांचा समोरासमोर अपघात होऊन बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. या अपघातात बलेनो कारमधील दोघांचा मृत्यू तर झाल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बलेनो कार ही नाशिककडे येत होती. तर बस कळवणकडे जात होती. प्रसंगी अक्राळे फाट्याजवळ या दोन वाहनांचा अपघात झाला. त्यात बसने पेट घेतल्यामुळे बलेनो कारमधील प्रवास करणारे दोघांचाही मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक दिसत असून बसमधील प्रवाशी सुखरूप असल्याचे माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच दिंडोरीचे पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्यासह दिंडोरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर त्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. बसचालक हा संबंधित बलेनो कारला ओव्हरटेक करत असतांना हा अपघात झाल्याचे चर्चा असून ही बस कळवण बस डेपो ची असल्या बाबत समजते.