स्थानीक गुन्हे शाखा अकोला यांची कार्यवाही…
अकोला – दिनांक १३/०७/२०२४ रोजी नामे वैभव तानाजी सांगळे रा. केशव नगर कोंडाना बिल्डींग अकोला यांचे आई वडील असे त्यांचे कडील मोटार सायलक क्रमांक MH-30-X-779 वर क्रिकेट स्टेडीयम ते जेल चौक असलेल्या पुलावरून जेल चौकाकडे जात असता दुपारी २:०० वा चे सुमारास जेल चौक कडे येणाऱ्या कारेन त्याचे मोटार सायलकलला मागुन ठोस मारून अपघात केला होता त्यामध्ये वैभव सांगळे चे वडील आणि आई हे जखमी झाले होते.
उपचारा दरम्याण त्यांची आई ह्या मरण पवाल्या मुळे गाडी क्रमांक MH-02-AQ-7901 च्या चालका विरुध्द पो. स्टे सिव्हील लाईन अकोला येथे अप नं ३९४/२४ कलम १०६ (१), २८१,१२५ (अ), १२५ (ब) बी. एन. एस २०२३ सह कलम १३४,१७७ एम. व्ही. अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद असून गाडी चालक हा गाडी सह फरार होता. सदर गुन्हयाचे महत्व लक्षात घेता मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह साहेब यांनी सदर गाडी चालक यास तात्काळ ताब्यात घेण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख श्री. शंकर शेळके साहेब यांना आदेशीत केले,
असता श्री. शंकर शेळके साहेब यानी त्यांचे अधिनीस्त पथक तयार करून त्यांना तात्काळ अपघात केलेल्या चालकास गाडी सह ताब्यता घेणे बाबत आदेशीत केले असता त्यांनी एक पथक गठीत करून त्यांना मार्गदर्शनकरून पथकाने रात्र भरात गोपनिय माहीतीच्या तसेच तांत्रिक विश्लेषनाव्दारे गाडी क्रमांक MH-02-AQ-7901 ही गंगानगर येथून ताब्यात घेवून आरोपी नामे ईस्माइल अहेमद मुमताज अहेमद वय ३० वर्ष रा. कागजीपुरा ताजनापेठ अकोला यास ताब्यात घेवून पुढील तपास कामी वाहनासह पो. स्टे सिव्हील लाई अकोला यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे साहेब, पो. नि श्री. शंकर शेळके स्थागुशा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा अकोला चे पोउपनि. आशिष शिंदे, पो. अंमलदार, अब्दुल माजीद, सुलतान पठाण, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, वसीम शेख, खुशाल नेमाडे, मोहम्मंद आमीर, शेख अन्सार, सतिश पवार, धिरज वानखडे, अभिषेक पाठक, अमोल दिपके, चालक पो. हवा प्रशांत कमलाकर, यांनी केली आहे.