Thursday, September 19, 2024
HomeMarathi News Todayश्री चक्रधर प्रभुंची शिकवण अंगीकारा...आचार्या श्री रिख्मिणी आक्का...

श्री चक्रधर प्रभुंची शिकवण अंगीकारा…आचार्या श्री रिख्मिणी आक्का…

पातूर :आजच्या युगामध्ये आदर्श मानवता विकास करायचा असेल तर महानुभाव पंथाचे आद्यप्रवर्तक परब्रम्ह परमेश्वर श्री चक्रधर प्रभुंची शिकवण प्रत्येकाने अंगीकारावी आणि ती कशी अंगीकारावी या बाबत सांगुन आदर्श मानवता निर्माण करणे काळाची गरज असल्याचे श्री चक्रधर स्वामी अवतार दिनाचे औचित्य साधत महानुभाव पंथीय महा मेळावा प्रसंगी अध्यक्षीय भाषनातून उपस्थिताना मार्गदर्शन केले. पुढे बोलताना सांगितले कि जागतिक शांती करिता श्री चक्रधर स्वामींची शिकवण महत्वाची ठरणार असल्याचे म्हटले.तसेच प्रमुख वक्ते डॉ किरण वाघमारे यांनी आदर्श समाजाची जडण घडण करण्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या माणवता धर्माची गरज असल्याचे सांगून गुजरात मधील भडोच येथील स्वामींचा “अवतार राजवाडा ” मुक्त होऊन सदर अवतार दिन महोत्सव तिथे पण साजरा व्हावा असे मत मांडले.

राजवाडा मुक्त व्हावा यासाठी सनातन धर्माचे सर्वच संप्रदायातील साधू संत महानुभाव पंथासोबत असल्याचे ही सांगितले. त्याच प्रमाणे प्रा.झाडे यांनी सर्वज्ञाची अहिंसा,समता,शांती, प्रेम व ज्ञानाचा संदेश देवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.तसेच जयराज दादा पंजाबी,अनुप लाड यांनी आदर्श महानुभाव वासनिक कसा असावा यावर मनोगत व्यक्त केले.या वेळी आदर्श महानुभाव संघटना पातूर तालुका कार्यकारणी मंडळाची नियुक्ती करण्यात आली.

पुढील वर्षापासून बाल संस्कार शिबीर घेण्यात येईल ज्यामध्ये विद्यार्थी तरुण मुलांना श्रीम्भगवद्गीता चा अभ्यास व शालेय जीवनात जगत असताना मुलांनी सर्वज्ञांची विचाराचे आचरण कसे करावे हे शिकवले जातील. कार्यक्रमाध्यक्ष्या स्थानी श्रीकृष्ण आश्रमच्या संचालीका प.पू.त.आचार्या श्री रुख्मिणीबाई आक्का होत्या सदर कार्यक्रमाचे नियोजन तथा संचालन महंत इंगोलिकर बाबा यांनी केले तर आभार प्रा.श्रीकांत लाहोळे अकोला यांनी मानले.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: