Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीउद्धव ठाकरे यांच्यासोबत निष्ठावंत राहिल्याने ED सरकार कडून गिफ्ट?...शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख...

उद्धव ठाकरे यांच्यासोबत निष्ठावंत राहिल्याने ED सरकार कडून गिफ्ट?…शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांना ACB ची नोटीस

कधी बघितली नसेल अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची दिसत असून जनताही यांच्या राजकीय तमाशा दोन्ही डोळ्यांनी बघत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड करुन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. आमदारांपाठोपाठ १२ खासदार देखील शिंदे गटात सहभागी झाले. उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे उभं राहणाऱ्या आमदारांमध्ये अकोला जिल्ह्यातील आमदार नितीन बाप्पू देखमुख यांचा समावेश आहे. त्यांनी एकनाथ शिंदे गटापासून सुटका करून घेतली, मात्र तेव्हापासून त्यांना कुठ तरी अडकविण्याचा डाव हे सरकार आखणार आहे असे जनसामान्यात वाटत होत आणि शेवटी तेच झाल.

बाळापूर मतदार संघाचे आमदार नितिन देशमुख यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासंदर्भात शासनाने निर्देशीत केल्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना नोटीस बजावली आहे. यासाठी अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आ.नितीन देशमुख यांना 17 जानेवारीला चौकशीसाठी बोलावले आहे. यासंदर्भात 6 जानेवारीरोजी एसीबीने बजावलेल्या नोटीसनुसार, आपल्या संपत्तीची उघड चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती येथे सुरु आहे. सदर उघड चौकशीसंदर्भात आपले बयाण नोंदवणे आ‌वश्यक असल्याने 17 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालय,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती येथे उपस्थित राहावे असे आदेश अप्पर पोलिस अधिक्षक अरुण सावंत यांनी दिले आहेत.

शिवसेना आमदार नितीन देखमुख यांची प्रतिक्रिया आली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले उद्धव ठाकरे यांच्यासोबत निष्ठावंत राहिलेल्या आमदारांवर दबाव आणण्याचा प्रकार घडत आहे. आपल्याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी खर्चाचे विवरण पत्र सादर करण्याचे लेखी पत्र दिले आहे. आपण आजवर कोणताही घोटाळा केलेला नाही. त्यामुळे एसीबीने मागितलेली माहिती सादर करू असे ते म्हणाले आहेत.

तर दुसरीकडे जिल्ह्यातील एका भाजपच्या आमदाराने 100 कोटींच्यावर माया जमविली मात्र त्याची अजिबात चौकशी होणार नाही का?…असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: