पातूर – निशांत गवई
काल दिनांक 25 जुलै रोजी उपसभापती सह एका पालक वर विविध गुन्हे चान्नी पोलिसांनी दाखल करण्यात आले होते याबाबत आलेगाव येथिल नागरिकांनि मोर्चा काढण्यात आला तसेच पातूर तालुक्यातील नागरिकांमध्ये चान्नी पोलिसां विरुद्ध रोष व्यक्त करण्यात येत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे कि इयत्ता नववी मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश का दिला जात नाही असा सवाल उपस्थित करत पातुर पंचायत समितीचे उपसभापती इमरान खान मुमताज खान यांनी आलेगाव येथील शहाबाबू उर्दू शाळेचे मुख्याध्यापक यांना कॉलर धरून खुर्चीवरून उठवले व थापळा बुक्क्याने मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली याप्रकरणी चान्नी पोलिसांनी उपसभापतीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पातुर तालुक्यातील आलेगाव येथील शहाबाबू उर्दू हायस्कूल येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता च्या सुमारास त्या ठिकाणी पातुर पंचायत समितीचे वंचित चे उपसभापती इम्रान खान मुमताज खान तसेच त्यांच्या समवेत पातुर पंचायत समितीचे शिक्षण केंद्रप्रमुख श्रीनिवास चव्हाण व अन्य काही मंडळी आली.
त्यापैकी उपसभापती इमरान खान मुमताज खान व अब्दुल सत्तार अब्दुल रशीद यांनी मला संगणक करून इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश का दिला जात नाही असा सवाल करत शिवीगार केली तू जास्त हुशार झाला का असे म्हणत मला मारहाण केली त्यांना मी समजावण्याचा प्रयत्न केला जिल्हा परिषद शिक्षक विभागाकडून अतिरिक्त विद्यार्थी समावेशाबाबत चर्चा विनिमय सुरू असून सध्या तरी आपल्याकडे ५० विद्यार्थ्यांची क्षमता आहे असे असताना ६७ विद्यार्थी आपल्याकडे असल्यामुळे वर्गात विद्यार्थ्यांना बसण्यात अडचण निर्माण होते असे सांगून सुद्धा त्यांनी माझे कुठले म्हणणे ऐकून घेतले नाही माझ्यासमोर असलेल्या शालेय दस्तावेज त्यांनी फेकून दिले आणि असली शिवीगाळ करत दोघांनी शाळेवर ये तुला गंमत दाखवतो अशी धमकी दिली यावेळी अनेक शिक्षक व नागरिक हजर होते.
या दोन्ही व्यक्तीकडून माझ्या जीवाला धोका असून दोघांनी केलेल्या शासकीय कामातील अडथळ्या बाबत व आपणास शिवीगाळ करून मारण व धाकधक केल्याबाबत संबंधित कारवाई करायची मागणी मुख्याध्यापक मोहम्मद मुस्ताक अब्दुल रहमान(५७) यांनी आपल्या तक्रारीत केली आहे यासंदर्भात चान्नी पोलिसांनी पातुर पंचायत समितीचे उपसभापती इमरान खान मुमताज खान व त्यांचा सहकारी अब्दुल सत्तार अब्दुल हमीद यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा करणे तसेच मुख्याध्यापकास मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे आलेगाव सह तालुक्यातील नागरिकतथा वंचित बहुजन पक्षा मध्ये चान्नी पोलिसां विरुद्ध खदखद व्यक्त होत आहे.
आलेगाव येथिल शाहबाबू उर्दू शाळेत मुलींना प्रवेश नाकरण्यात येत असल्याचि तक्रार प्राप्त झाली असता 25 जुलै रोजी मि विस्तार अधिकारी श्रीनिवास चव्हाण, आलेगाव चे सरपंच तथा पालक मंडळी शाळेत जाऊन सदर प्रकरणाबाबत शहनिशा केल्यानंतर त्याबाबत विस्तार अधिकारी यांनी अहवाल लिहून आम्ही त्या ठिकाण वरून निघून गेलो असता मुख्याध्यापक व काही राजकीय मंडळीयांनी आकसबुद्धी ने माझ्यासह एका पालका विरुद्ध खोटी तक्रार देऊन माझ्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून माझा संविधान वर पूर्णपणे विश्वास आहे इम्रानखान मुमताज खान उपसभापती प. स. पातूर…